क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री (reason)वर्मा यांचं नातं आता अधिकृतरीत्या संपुष्टात आलं आहे. 20 मार्च 2025 रोजी वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केलं. डिसेंबर 2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीचं नातं केवळ चार वर्षांतच संपलं. घटस्फोट अर्जामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चहल आणि धनश्री यांचं ब्रेकअप जून 2022 मध्येच झालं होतं. म्हणजेच लग्नानंतर अवघ्या 19 महिन्यांत दोघं वेगळे झाले होते. मात्र त्यानंतरही दोघेही अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर फोटो शेअर केले गेले. त्यामुळे चाहत्यांना ते अजूनही एकत्र आहेत असंच वाटत होतं. पण प्रत्यक्षात ते त्या वेळेसही एकमेकांपासून दूर झाले होते.
सहा महिन्याची प्रतीक्षा टाळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज :
हिंदू विवाह कायद्यानुसार, घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर सहा (reason)महिन्यांची प्रतीक्षा कालमर्यादा असते. मात्र, चहल आणि धनश्री या दोघांनीच मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली की, “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होतोय, त्यामुळे आम्हाला सहा महिने थांबण्याची गरज नाही.” यावर उच्च न्यायालयाने सहमती दर्शवत फॅमिली कोर्टाला तात्काळ घटस्फोट देण्याचे निर्देश दिले.

धक्कादायक बाब म्हणजे, घटस्फोट अर्जात जून 2022 नंतर दोघं एकत्र राहत नव्हते, हे स्पष्टपणे नमूद केलं गेलं आहे. तसेच 2023 मध्ये धनश्रीने तिच्या सोशल मीडियावरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकलं होतं, ज्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने लिहिलं आहे, “लग्न हा एक काल्पनिक शब्द आहे. तो असं आहे जसं की, मोठं झालेलं (reason)मूल कोणीतरी दत्तक घेतंय, कारण त्याच्या आई-वडिलांना त्याची जबाबदारी घेता येत नाही.” ही पोस्ट अनेकांना भावनिक वाटली तर काहींना ती टोमणेबाज वाटली.मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला घटस्फोटाच्या नंतर पोटगी स्वरूपात तब्बल 4.75 कोटी रुपये दिले आहेत. यापैकी 2.37 कोटी रुपये आधीच धनश्रीला देण्यात आले होते.
हेही वाचा :
कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह
उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय? आताच सावध व्हा! नाहीतर…
‘रेखा फक्त पैसे न देणाऱ्यांसोबत.. राकेश रोशन यांनी उघड केला खरा चेहरा