सर्वसामान्यांच्या शिक्षण हक्कासाठी प्राथमिक शिक्षकाचां जागे व्हा चा नारा

रत्नागिरी-शिक्षकांना मराठी शाळेत शिकवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे(slogan design) या मराठी शाळा ओस पडत चालल्या, व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी इतकी वाढायला लागली की पालकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व प्रकारचे शिक्षण मोफत व सक्तीचे असल्यामुळे त्यासाठी कोणालाच कोणतीच फी घेता येणार नाही यासाठी लोक चळवळीद्वारे शिक्षकांना शिकू द्या, व सर्व शाळांमध्ये समान सुविधा व समान न्याय द्या त्यासाठी प्राथमिक शिक्षक प्रवीण रावसाहेब किणे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी बसणार आहेत.

पत्रकारांशी बोलताना प्रविण किणे(slogan design) यांनी सांगितले की, कोणतेही नियोजन न करता भाराभार उपक्रम राबविण्यात येत आहेत, शिक्षकांच्या माथी अनेक कामे थोपण्यात येत आहेत. यासाठी शिक्षक घाबरून शांत असला तरी सर्वसामान्य गरीब मुलांचे मात्र नुकसान होत आहे.

जीडीपीच्या 6 टक्के शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित असून शिक्षणाचा बाजार झाला आहे. शिक्षण गरीब व श्रीमंत मुलासाठी वेगळे झाल्यामुळे नीट, जेई, स्पर्धा परीक्षा या परीक्षेमध्ये ग्रामीण मुले कशी पुढे जाणार हा खरा प्रश्न आहे..
आज शिक्षण जर चांगले दिले गेले नाही तर संपूर्ण पिढी खराब होणार आहे. 78 वर्षानंतर सुधा नेटवर्क, कॉम्प्युटर या बेसिक सुविधा शाळांना मिळत नाहीत.. त्यामुळे ग्रामीण भागात खरी लोकचळवळ जागविण्याचा माणस घेऊन हे आंदोलन उभे केले आहे.

ठिणगी पासून वणवा पेटतो त्यामुळे पालक व शिक्षकांच्या असंतोषाला वाट करून देण्याचे काम वणवा या नावाने त्यांनी हाक दिली आहे. आर टी ओ चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद व अनेक शिक्षकांनी , पालकांनी भेटून त्यांना पाठिंबा दिला आहे.

ठिणगी चे प्रतीक म्हणून ते 15 ऑगस्टला एकटेच उपोषणाला बसणार आहेत. 5 सप्टेंबर पासून शिक्षण व्यवस्था बदलन्यासाठी प्रविण किणे यांच्या मार्फत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आपण सर्व शाळा या प्रश्नासाठी भाऊक असतो. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही अशी हाक त्यांनी जनतेला दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 7020843099 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रविण किणे यांनी केले आहे.

हेही वाचा :

अगरवाल दाम्पत्याच्या जामीन अर्जास विरोध; पोलिसांनी कोर्टाला सादर केली गंभीर माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे तपशील: दिवाळीनंतर मतदान, नोव्हेंबरमध्ये निकाल

चीनमधील 13 वर्षीय चिमुकलीचा भरतनाट्यममध्ये ऐतिहासिक प्रवास: एक अनोखा अनुभव