कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : डरना जरुरी है, डरना मना है हे राम गोपाल वर्मा (politics)यांचे दोन भयपट रजत पटावर चांगलेच गाजले. राम भरोसे यांचे दो गज जमीन के नीचे यासारखे हॉरर सिनेमे सुद्धा तिकीट खिडकीवर भरपूर चालले. अलीकडच्या काळातील अक्षय कुमारचा चंद्रमुखी तसेच भानामती असे अनेक हिंदी चित्रपट पडद्यावर धुमाकूळ घालून गेले. या सर्व चित्रपटांचे कथा बीज हे अतृप्त आत्मा, भटकती आत्मा यावरच आधारित होते.
राजकीय(politics) पार्श्वभूमीवर आधारित राजनीति, अपहरण यासारखे भव्य चित्रपटांचे निर्माण करणाऱ्या प्रकाश झा यांनी राजकारणावर आधारित एखादा हॉरर सिनेमा काढावयाचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी कथा, पटकथा तयार आहे. आणि ती वास्तवातील आहे. फार तर दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी संजय राऊत यांच्यावर सोपवावी. ते ही जबाबदारी नीटपणे पार पाडतील.
“आत्मा”या नावाने हिंदी मध्ये आणि राजकीय “आत्मा”या नावाने मराठी मध्ये हा चित्रपट निर्माण करून तो आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रदर्शित केला तर “काश्मीर फाइल्स”सारखे यश नक्की मिळेल. पॉलिटिकल हॉरर अँड कॉमेडी सिनेमा किंवा पॉलिटिकल हॉरर अँड ब्लॅक कॉमेडी सिनेमा अशी वन लाईन स्टोरी ट्रीटमेंट या सिनेमाला देता येईल. फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नाय हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. कारण आत्मा, अतृप्त आत्मा, भटकती आत्मा हा विषयाचा त्यांच्यासाठी निषिद्ध आहे.
तसे पहिले तर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून देशभर ओळखला जातो. म्हणूनच शरद पवार यांच्यासारखे नेते देवधर्माच्या किंवा देवदर्शनाच्या विषयात फारसे पडत नाहीत. कोल्हापूर हे त्यांचं आजोळ असूनही ते कधीही करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला वाट वाकडे करून आलेले नाहीत. पंढरीचा विठ्ठल तर त्यांच्यासाठी खूप दूरचा.
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात साठ वर्षाहून अधिक काळ सक्रिय असलेल्या शरद पवार यांना कधी काळी गुरु म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लोकसभा निवडणूक प्रचार सभेत “भटकती आत्मा”म्हटले होते. आणि मग महाराष्ट्रात”आत्मा”रामचा सिलसिला सुरू झाला. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार हे राजकारणातले आपले आदर्श समजणारे संजय राऊत हे मग कसे काय गप्प बसतील?शरद पवार हे भटकते आत्मा असतील तर ते तुम्हालाच भटकायला लावतील असे ते म्हणत होते.
लोकसभेचे एकट्या भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. एनडीएच्या सहकार्याने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट झाल्यावर इंडिया आघाडीपेक्षा संजय राऊत यांना दुःख झाले. कारण मोदी हे दिनांक चार जून नंतर पुन्हा पंतप्रधान पदावर दिसणार नाहीत असं त्यांनी वारंवार भाकीत केलं होतं. एनडीएच सरकार बनू नये म्हणून त्यांनी नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनाच इंडिया आघाडीत या असे आवाहन केले होते. नितेश कुमार आणि चंद्रबाबू यांना नरेंद्र मोदी यांनी किती त्रास दिला आहे याची त्यांना ते आठवण करून देत होते.
अखेर हे दोघेही एनडीए(politics) मधून बाहेर पडत नाही हे स्पष्ट झाल्यावर संजय राऊत यांना नितेश कुमार आणि चंद्राबाबू हे दोघेही अतृप्त आत्मे असल्याचा साक्षात्कार झाला. हे दोन अतृप्त आत्मे एनडीए सरकार टिकू देणार नाहीत. सहा महिन्यात मोदी सरकार कोसळेल असे बाकी त्यांनी केले आहे. आता या दोन आकृत्यांना ते आमच्याकडे या असे का म्हणत होते? एनडीए मध्ये अतृप्त आणि इंडिया आघाडीत आल्यावर तृप्त असे त्यांना म्हणावयाचे आहे काय?
महायुती मधील एका नेत्याने असे म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका ह्या एक महिन्यानंतर झाल्या असत्या तर संजय राऊत हे खासदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिसले असते का? तेही राज्यसभेच्या सदस्यत्वापासून अतृप्त राहिले असते. तर असे हे राजकीय “आत्मा”राम येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भटकती आत्मा, अतृप्त आत्मा याच विषयावर बोलताना दिसतील.
हेही वाचा :
ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग
शेअर बाजारात जोरदार तेजीची शक्यता; अंबुजा सीमेंट-फेडरल बँकसह ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष
शरद पवार, सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?