धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल सांगता(selfie mirror) येत नाही. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी लोक इकक्या धोकादायक गोष्टी करतात की ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल(selfie mirror) होत आहे, ज्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. काही लोक ट्रेनजवळ उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्रेन जवळ येताच प्रत्येकजण आपापले मोबाईल फोन काढतो आणि सेल्फी काढण्याच्या तयारीत असतो. पण याच दरम्यान एका मुलीसोबत असा अपघात झाला, ज्याने सगळेच हैराण झाले आहेत.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनजवळ अनेक लोक सेल्फी घेण्यासाठी उभे आहेत. एक मुलगी ट्रेन जवळ आल्यावर उत्साहात ट्रॅकच्या अगदी जवळ येते. सेल्फी काढण्यासाटी ती फोन सेट करत असते. ट्रेनचा वेग किती जास्त असतो की ट्रेन तीला जोरदार धडक देऊन जाते. एवढ्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं किती धोकादायक असू शकतं याची बहुधा त्या मुलीला कल्पना नव्हती.

मुलगी पुढे सरकत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच ती ट्रेनच्या इंजिनला धडकली. ट्रेनच्या इंजिनला धडकताच मुलगी जमिनीवर पडली. व्हिडीओ पाहता, तिला खूप गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल. या अपघातानंतर आजूबाजूचे लोकही काही क्षमासाठी स्तब्ध जाले होते. हा व्हिडीओ कुठला आहे आणि या घटनेनंतर मुलीची प्रकृती काय आहे हे अद्याप कळालेले नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SecB4_Blunder या अकाुंटवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. काही युजर्सनी त्या मुलीची स्थिती काय आहे, ती ठिक आहे की नाही या बद्दल विचारले आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, तरुणांनी सोशल मीडियाच्या नादात त्यांच्या सुरक्षितेतकडे लक्ष द्यावे, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, या घटनेने तर माझा थरकाप उडाला आहे. मी कधीच असे करणार नाही.

हेही वाचा:

टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…

मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांनी कोल्हापूरचं राजकारण ढवळून काढलं

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती