कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आधी मंत्री मंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडत नव्हता. त्यानंतर कोणाला किती मंत्री पदे हे ठरत नव्हते. विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळाला, मंत्री पदाचे वाटप झाले आणि नंतर खाते वाटप(politics) रखडले. महत्त्वाची खाती कुणाकडे? यावर बैठकांचे सत्र सुरू झाले. त्यातून तोडगा निघाला आणि मंत्र्यांना खाती मिळाली. नंतर जिल्ह्याचे पालक कोण या प्रश्नाचे उत्तर लवकर मिळत नव्हते.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार(politics) या तिघांनी एकत्र बैठक घेऊन पालकत्वाचा प्रश्न निकाली काढला. कारण प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि कोणत्या मंत्र्याने जिल्ह्याचा पालक म्हणून त्या दिवशी ध्वजवंदन करायचे याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. आता तोही महत्त्वाचा प्रश्न संपुष्टात आणला गेलेला आहे.
पालकमंत्री म्हणून आपणाला हाच जिल्हा मिळाला पाहिजे यासाठी मंत्र्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री बनले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे.
गडचिरोली मधून माओवाद संपुष्टात आणण्याचा, तेथील नक्षलीना मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यांना शस्त्र खाली ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा तसेच गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी बनवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी त्यांना विशेष लक्ष गडचिरोली जिल्ह्याकडे द्यावे लागणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार याबद्दल सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती.
तथापि अजितदादा पवार यांनी स्वतःकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे घेऊन सध्या वादग्रस्त बनलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना योग्य तो संदेश त्यांच्याकडून दिला गेला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पद दिले गेले असते तर महाराष्ट्रातून नाराजीच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असत्या. ते टाळण्यासाठी आणि आम्ही मुंडे यांना बे दखल केले आहे हे सांगण्यासाठी अजितदादा यांनी स्वतःकडे पालकत्व घेतले आहे.
सह पालकमंत्री पद हे पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे. राज्यातील दोन जिल्ह्यांना सह पालक मंत्री पद मिळाले असून त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. शिवसेनेचे(politics) प्रकाश अबिटकर आणि भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले आहे. एकाच जिल्ह्याला दोन पालकमंत्री देण्यामागचा नेमका उद्देश कळालेला नाही.
शिंदे गटाचे भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे रायगडचे पालकत्व सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे गोगावले हे नाराज झाले आहेत. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद हवे होते तथापि त्यांना वाशिम जिल्हा देण्यात आला आहे. चंद्रकांत दादा पाटील यांना सांगलीचे पालकत्व देण्यात आले आहे.
मंत्री पदापेक्षा पालकमंत्री पद हे अधिक महत्त्वाचे समजले जाते काय? आणि समजले जात असेल तर त्या मागची कारणे कोणती? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे आणि त्याचे नेमके उत्तर माहित असूनही ते समोर आणले जात नाही.
जिल्ह्याचा दरवर्षीचा विकास आराखडा तयार केलेला असतो. त्याप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाकडे राज्य शासनाचा निधी उपलब्ध होतो. या नियोजन मंडळाची सूत्रे पालकमंत्र्यांच्याकडे असतात.
मंजूर झालेला निधी खर्च करण्याचे सर्व अधिकार पालकमंत्र्यांना(politics) असतात. एक प्रकारची जिल्ह्याची तिजोरीच पालकमंत्र्यांच्या हातात असते. त्यातून जास्तीत जास्त निधी आपल्या विधानसभा मतदारसंघात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच पालक मंत्री पदाला मूळच्या मंत्रिपदापेक्षा अधिकचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता कोल्हापूरला प्रकाश अबिटकर आणि माधुरी मिसाळ हे दोन पालकमंत्री मिळालेले आहेत. आता तोंडावर आलेल्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कुणाच्या हस्ते केले जाणार? या प्रश्नाचे उत्तर त्याच दिवशी मिळणार आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश अबिटकर यांना जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवावे लागतीलच शिवाय कोल्हापूरचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. सीपीआर रुग्णालय हे आता जवळपास प्रादेशिक रुग्णालय बनले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल होत असतात. सध्या या सीपीआर रुग्णालयाचे आरोग्य बिघडलेले आहे.
आधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच विविध प्रकारच्या मशिनरीज या दवाखान्याकडे उपलब्ध नाहीत. आणि आहेत त्या मशिनरीज नादुरुस्त आहेत. या रुग्णालयातील औषध विभागात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांना आधी सीपीआर रुग्णालयाचे आरोग्य सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही तर थेट शस्त्रक्रियाच करावी लागणार आहे. म्हणूनच त्यांच्यावर या जिल्ह्याची दुहेरी जबाबदारी आहे.
हेही वाचा :
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
CV ठेवा तयार! देशातील ‘या’ नामांकित कंपनीत 10 ते 12 हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार
पती-पत्नी और वो…आता काय फुल ऑन राडा! पत्नीने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले Video Viral