कोल्हापूर ही कुस्तीपटुंची पंढरी असल्याचे एका घटनेमुळे आता पुन्हा दिसू लागले आहे. शेतमजूर असलेल्या सामान्य शेतकऱ्याच्या 13 वर्षीय मुलीने नुकत्याच झालेल्या आशियाई (represented)चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पंधरा वर्षाखालील 33 किलो गटात यश मिळवले आहे. रोहिणी देवबा असे या लहानग्या कुस्तीपटूचे नाव आहे. तिने थायलंडमध्ये भारताचे प्रातिनिधित्त्व करत उझबेकीस्तानच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले आहे.
घरची परीस्थिती अत्यंत गरीबीची असतानाही परिश्रम घेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल रोहिणीची गावकऱ्यांनी चक्क हत्तीवरून जंगी मिरवणूकही काढली होती. तर तिच्या या यशाचे सध्या पंचक्रोशित कौतुक देखील होत आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात देवबा कुटुंब राहते. या कुटुंबाची घरची परीस्थिती अत्यंत प्रतिकूलच. वडिलोपार्जित फक्त 17 गुंठे जमीन कसणाऱ्या शेतमजूर आणि शेतकरी खानदेव यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. खानदेव यांना देखील कुस्तीची प्रचंड आवड होती. मात्र, परिस्थितीमुळे आहे त्यांना स्वतःची आवड जपता आले नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या मुलीला, रोहिणीला अगदी वयाच्या नवव्या वर्षापासून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली होती. वेळप्रसंगी घरातील दागिनेही त्यांनी गहाण ठेवले होते. मात्र, याच परिस्थितीतून अथक परिश्रमाने आता रोहिणीने आई-वडिलांचे पांग फेडले आहेत. (represented)मजल दरमजल करत तिने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
रोहिणी ही गेली 4 वर्षे कोल्हापूरच्या दोनवडे येथील एनआयएस कुस्ती केंद्र या ठिकाणी संदीप पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत आहे. दररोज सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास ती सराव करत असे. त्यामुळेच थायलंड येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील झालेल्या एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रोहिणी देवबाचे वडील शेतीतून मिळणाऱ्या पैशांवर गुजराण करत आहेत. रोहिणीचे प्रशिक्षण तर लांबचीच गोष्ट, तिच्या खुराकासाठी देखील तिचे वडिल पैसे जमवू शकत नाहीत. त्यामुळेच मोफत तिला प्रशिक्षण दिले जात होते. अशा परिस्थितीमध्ये रोहिणीने कधी साधे बदामही न खाता, भारत देशासाठी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, ही खूपच कौतुकास्पद बाब आहे, असे मत रोहिणीचे प्रशिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
लोकल18 शी बोलताना संदीप पाटील यांनी सांगितले की, 15 वर्षाखालील स्पर्धा ही चांगलीच चुरशीची स्पर्धा होती. या स्पर्धेच्या तयारीसाठी रोहिणीचा मुलांच्या बरोबर कुस्ती करून सराव करून घेण्यात आला. त्यामुळेच जे भारतातील फेऱ्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिने चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच फायनल पर्यंत तिने कुणालाही विरोधात पॉइंट मिळवू दिले नाहीत. त्यामुळेच 10-0 च्या फरकाने सर्वांना हरवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
भारताचे नेतृत्व करत रोहिणीने 33 किलो वजनी गटात जपान, मंगोलिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात केली. जपानच्या मुलीबरोबर (represented)रोहिणीची पहिली कुस्ती झाली. फक्त त्या मुलीनेच 2-0 च्या फरकाने रोहिणीला रोखले होते. पण तिचा अभ्यास केला असल्याने तिला पराभूत करण्यापासून फायनलला रोहिणीने धडक मारली. रोहिणीची फायनल उझबेकिस्तानच्या मुलीबरोबर होती. मात्र, तिचा मुलांसोबत कुस्तीचा सराव झाला असल्यामुळे 10-0 च्या फरकाने तिने फायनलमध्ये प्रतिस्पर्धी स्पर्धकाला हरवत पदकावर आपले नाव कोरले, असेही संदीप पाटील म्हणाले.
कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्पर्धांसाठी ट्रायल झाल्या होत्या. त्यानंतर नोएडा येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. पुढे नोएडामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी ट्रायल झाल्या. त्यामधून निवड झाल्यामुळेच थायलंडमध्ये मला स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करता आले. आता ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. यापुढेही ऑलिम्पिकचे माझ्ये ध्येय असून त्यासाठीची माझी तयारी सुरू राहील, असे रोहिणी देवबाने सांगितले आहे.
हेही वाचा :
शरद पवार गट कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा जागा लढवणार
धरणक्षेत्रात अतिवृष्टीची पुनरावृत्ती; पंचगंगेच्या पाणीपातळीच्या वाढीचा इशारा
नवऱ्याला सोडून ऐश्वर्या राय परदेशात रवाना समोर आलेला फोटो थक्क करणारा