आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असल्यावर आपण त्यांना रात्री १२ वाजता विश(birthday wishes) करतो. बरोबर १२ वाजता विश करण्यासाठी अनेक जण रात्रभर जागे राहतात. अशात सकाळी लवकर उठायचे असल्यास अशा वाढदिवसांमुळे झोपपूर्ण होत नाही. तर आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बरोबर रात्री १२ वाजता विश करायचे असेल तर रात्री जागे राहण्याची गरज नाही. कारण फोनमध्ये यासाठीचा एक जुगाड आम्ही शोधलाय.
तुम्ही रात्री झोपेत असाल तरी देखील संबंधित व्यक्तीला तुमचा मॅसेज(birthday wishes) पोहचू शकतो. यासाठी तुमच्याकडे एन्ड्रॉइड फोन असायला हवा. हे फिचर फक्त मॅसेंजरसाठी उपलब्ध आहे. मॅसेंजरमध्ये अशा पद्धतीने मॅसेज करण्यासाठी मॅसेज शेड्युलचा पर्याय उपलब्ध आहे.
मॅसेज शेड्युल कसा करायचा?
१. सर्वांत आधी तुमच्या फोनमधील मॅसेंजर बॉक्स ओपन करा.
२. त्यानंतर ज्या व्यक्तीला मॅसेज पाठवायचा आहे त्याना नंबर सिलेक्ट करा.
३. त्यावर मॅसेज टाइप करून घ्या. हा मॅसेज लगेचच सेंड करू नका.
४. मॅसेज सेंड करताना की होल्ड करून ठेवा.
५. त्यानंतर तुम्हाला शेड्यूलसाठी ऑप्शन दिसेल.
६. यामध्ये तुम्ही तारीख आणि वेळ दोन्ही गोष्टी सिलेक्ट करून मॅसेज शेड्यूल करू शकता.
अशा पद्धतीने मॅसेज शेड्यूल करून तुम्ही निवांत झोपू शकता. असे केल्याने तुमा वेळ वाचेल, रात्री जागावे लागणार नाही, तसेच तुमच्या प्रिय व्यक्तीला वेळेत तुमचं बर्थडे विश मिळेल.
अनेक जोडप्यांमध्ये रात्री १२ ला बर्थडे विश न केल्याने भांडणे होतात. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड रुसून बसतात. या सर्व गोष्टी मॅसेंजरमधील या ट्रिकने तुम्हाला टाळता येतील.
हेही वाचा :
सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी,अपक्ष अर्ज दाखल, मविआची डोकेदुखी वाढली
सांगलीतून भाजपला धक्का! भाजपच्या माजी आमदाराचा विशाल पाटलांना पाठिंबा