लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढणार! अर्जाची पडताळणी होणार सुरु?’

महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. (Political)विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला यश मिळाल्यानंतर २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन दिले गेले होते. या योजनेअंतर्गत आता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.

महायुती सरकारने(Political) विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. या या योजनेअंतर्गत सरकार आता महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले आहेत.त्यामुळे आता सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अर्जाची तपासणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांपर्यंतच मदत करण्यासाठी भर देण्यात येणार आहे. या पडताळणीचा उद्देश प्रक्रियेत केवळ पात्र महिलांना लाभ मिळावा असा आहे.

या योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांना पडताळणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी खोटे दावे केले आहेत, त्या महिलांना आता लाभ मिळणार नाही. या योजनेत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

ज्या महिलांच्या कुटुंब २.५ लाखांपेक्षा कमी आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचा पुरावा त्यांना सादर करावा लागेल.

आयकर प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यातून लाभार्थ्यांची वैधता चेक केली आहे.

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन- अर्जदारांना निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहन आहे की नाही या छाननीला सामोरे जावे लागणार आहे.

कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा- एका कुटुंबातीत फक्त २ महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे.

हेही वाचा :

…म्हणून महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होणार 5 डिसेंबरला अन् तेही 5 वाजता

ताजमहल बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ

एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती