कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : धनंजय मुंडे यांची पिल्लावळ असलेल्या वाल्मीक कराड आणि त्याची मोकार पंती टोळी यांचा रक्तबंबाळ दहशतवाद उभ्या महाराष्ट्राने घरातील छोट्या पडद्यावर पुराव्यासह पाहिला आहे(politics). आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याची क्रूरता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडावा अशी दृश्ये या व्हिडिओमध्ये आहेत.

मुंडे विरुद्ध धस यांच्यातील कुरघोडीचे राजकारण (politics) आता दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू झाले असून ते येत्या काही दिवसात अधिकाधिक तीव्र होत जाईल. राजकारणातील बाहुबलींच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील दहशतीची कीड समोर आली असली तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत”कराड”पंथीयांची पिल्लावर वळवळ करताना दिसते.
अंगावर लिनन ची सफेद कपडे, डोळ्यावर गॉगल, मनगटावर सोन्याचे जडसर ब्रेसलेट, दोन्ही हाताच्या बोटांवर किमान सात ते आठ सोन्याच्या तसेच हिऱ्याच्या अंगठ्या, गळ्याभोवती पिवळी धम्मक सोन्याची किमान 200 ते 300 ग्रॅम वजनाची साखळी, हातामध्ये दीड दोन लाख रुपये किमतीचा आयफोन, पायात महागडे शूज किंवा कराकरा वाजणारे पायतान असा नखं सिखांत नटलेला माणूस हा बहुतांशी गुंडच असतो.
किंबहुना आजच्या गुंडांची ती ओळखच बनली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले हा असाच पाहायला मिळतो आहे. हेलिकॉप्टर मधून उतरून आपल्या आलिशान कारकडे छाती फुगून चालत असलेला खोक्या भोसले याला घरच्या छोट्या पडद्यावर करोडो लोकांनी पाहिले तेव्हा अमरीश पुरी खलनायक असलेल्या चित्रपटातील हा प्रसंग आहे असेच प्रत्येकाला वाटले असेल.
भारतीय जनता पक्षाच्या विमुक्त मागास सेलचा खोक्या भोसले हा अध्यक्ष आहे. एका तरुणास तो लाकडी फळीने तळपायावर जोर जोराने फटके मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पाहणाऱ्यांच्या हृदयाची धडधड वाढवत होता. अंगावर शहारे आणत होता. या व्हिडिओतील दृश्याचे त्याने समर्थन केले आहे आणि कबुलीही दिली आहे. विशेष म्हणजे पाय मोडलेल्या त्या तरुणाची साधी तक्रारही पोलिसांनी घेतली नव्हती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खोक्या भोसले वर गुन्हा दाखल झाला आहे.
एका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा इमारतीच्या बाहेर जमिनीवर बसवून विद्यार्थ्यांना तो हात पाय तोडण्याची धमकी देत असल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे(politics). पाचशे रुपयांची बंडले बागेतून काढून तो आपल्या आलिशान कारच्या दर्शनी भागात रचून ठेवत असल्याचे व्हिडिओतील दृश्य पाहून आपण एखादा हिंदी चित्रपट आणि त्यातील खलनायक तर पहात नाही ना? असा प्रत्येकाला प्रश्न पडावा.
धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड हा आपला विश्वासू कार्यकर्ता असल्याचे मान्य केले होते आणि त्याला क** शिक्षा झाली पाहिजे असेही म्हटले होते. आता आमदार सुरेश धस यांनीही तशीच कबुली देऊन खोक्या भोसले यास शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. वाल्मीक कराड हा लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे तर खोक्या भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त जाती मागासवर्ग सेलचा अध्यक्ष आहे. याचा अर्थ दोघांनाही राजकीय सुरक्षेचे कवच आहे असे म्हणता येईल.
वाल्मीक कराड याच्या”मोकार पंती”गुंडांच्या हैवानालाही लाजवेल अशा कृत्याने महाराष्ट्राचा थरकाप उडाला तर खोक्या भोसलेच्या अमानुष कृत्याने संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून निघाले. राजकीय आशीर्वाद, पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय गुंड आणि त्यांच्या डोळ्यांची दहशत वाढूच शकत नाही आणि दहशत हा अफाट पैसा कमावण्याचा या”कराड”पंथीयांनी राजमार्गच बनवून टाकला आहे असे विदारक वास्तव महाराष्ट्राच्या समोर आले आहे.
वाल्मीक कराड यांच्या टोळीतील “मोकार पंती”कृष्णा आंधळे याचे चार व्हिडिओ कॉल पोलिसांना पुरावे म्हणून मिळालेले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्याने हे व्हिडिओ कॉल केलेले आहेत(politics). त्यातील संभाषण ऐकताना या कराडपंथीयांनी क्रूरतेची किती परिसिमा गाठली होती हे लक्षात येऊ शकेल. वाल्मीक कराड आणि त्याची पिल्लावळ तसेच खोक्या भोसले यांना अंगावर शहारे येणारे गुन्हे करताना कायद्याचे भय वाटत नव्हते. कारण या सर्वांना आपले राजकीय गॉडफादर आपणाला कायद्याच्या कचाट्यातून वाचवतील असे वाटत असले पाहिजे.
राजकीय आश्वासक वातावरण असल्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारचे भयचकित करून सोडणारे गुन्हे घडलेले आहेत असे म्हणता येईल. कोणताही गुंड किंवा त्याची टोळी एका रात्रीत उदयास येत नाही. या गुंडांची दहशत प्राथमिक अवस्थेत होती तेव्हाच कठोरपणाने ठेचून काढली असती तर भविष्यात असे कराड पंथीय निर्माण होऊ शकले नसते. छोट्या गुन्ह्यापासून ते मोठ्यां गुन्ह्यापर्यंतचा त्यांचा दहशतीचा प्रवास हा राजकीय पाठबळ असल्यामुळे झालेला आहे, पोलिसांच्या जाणीवपूर्वक किंवा सोयीस्कर दुर्लक्षितपणातून या टोळ्या मोठ्या झाल्या आहेत असे म्हणता येईल.
“कराड” पंथीय प्रवृत्ती केवळ बीड, जालना या जिल्ह्यापूर्ती मर्यादित नाही तर ती चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात थोड्याफार फरकाने दिसते आहे. कोल्हापुरही त्यांला अपवाद नाही.
हेही वाचा :
सोन्याच्या भावात घसरण, चांदीचे भाव घसरलं!
‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा! केसांचे होईल गंभीर नुकसान
‘एकतर्फी प्रेम फक्त…’ तमन्ना भाटिया ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान ‘हे’ काय बोलून गेली