क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. क्रिकेटमध्ये(cricket) नवीन आगळावेगळा नियम लागू केला जाणार असून क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट काढली जाणार आहे. क्रिकेट सामन्यांमध्ये नाणेफेक खूप महत्त्वाची गोष्ट असते. नाणेफेक जिंकणारा संघ बहुतेकवेळा सामना जिंकत असतो. मात्र आता तेच हद्दपार होणार आहे. हे वाचून जरा धक्का बसला असेल पण तुम्ही जे वाचलं ते बरोबर आहे.
बीबीसीआय क्रिकेटमधून(cricket) टॉसला हद्दपार करणार आहे. अंडर २३ च्या म्हणजेच २३ वर्षाखालील टूर्नामेंट सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक रद्द केली जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयने प्रस्ताव सादर करून सूचना मागवल्यात. या नव्या नियमानुसार पाहुण्या संघाला नाणेफेक न जिंकता फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा पर्याय असेल. याबाबतचा प्रस्ताव दुसरं कोणी नाही तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सादर केलाय. देशांतर्गत क्रिकेटचे नियम बदलण्यासाठी त्याने अनेक प्रस्ताव मांडलेत. त्या प्रस्तावांमध्ये त्यांनी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्तावही मांडलाय.
२३ वर्षांखालील टूर्नामेंट सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक लवकरच रद्द केली जाऊ शकते. यजमान संघाला फारसा फायदा मिळू नये म्हणून हे केले जात आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा टी-२० क्रिकेट, त्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावतं असते. कसोटी क्रिकेटमध्ये यजमान संघाला खेळपट्टीचा भरपूर फायदा होतो, कारण ते आपला कमकवूतपणा आणि ताकद लक्षात घेऊन खेळपट्टी तयार करत असतात.
अशा स्थितीत यजमान संघाने नाणेफेक जिंकली तरी प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकणे कठीण होत असते. या परिस्थितीत निष्पक्ष सामना खेळता येणार नाही, असं अनेक खेळाडूंचे मत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरनेही याबाबत प्रश्न उपस्थित केलेत.
याशिवाय पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजीची निवड असली पाहिजे, असंही मत अनेक खेळाडूंनी व्यक्त केलंय. त्यामुळे बीसीसीआयने नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास २३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेतून नाणेफेक लवकरच हद्दपार होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा :
आनंद महिंद्रा यांनी दाखवली देशातील पहिल्या हवाई टॅक्सची झलक
ह्रदयद्रावक! उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन