वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ(traffic) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आत्महत्या करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी महिलेचे प्राण वाचवले. याचा थरारक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये (traffic) कैद झाला आहे. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या महिलेने म्हटलं आहे. झालं असं की, 16 ऑगस्टरोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली.

यावेळी महिलेने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने महिलेला धरून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलिस देखील तिथे आले.

या वाहतूक पोलिसांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि समयसुचकतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेनंतर सदर महिलेने पोलिस जबाब देखील दिला आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या या 56 वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असल्याची माहिती मिळत आहे.

या महिलेने देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं पोलिस जबाबात सांगितलं आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.”

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता.

हेही वाचा :

हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालांचा महाराष्ट्रावर परिणाम ?

गणेशोत्सवासाठी बोरिवली ते सावंतवाडी थेट रेल्वे सेवा: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मोठे निर्णय

सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, ‘गुलिगत किंग’साठी खास पोस्ट