‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट ट्रेलर(trailer) अलिकडे रिलीज करण्यात आला आहे. सिंघम अगेन चित्रपट 2024 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. दिग्गज स्टारकास्ट असलेल्या सिंघम अगेन चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच करण्यात आला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सिंघम अगेन चित्रपटाची कहाणी रामायणापासून प्रेरित असल्याचं दिसत आहे.

सिंघम अगेनच्या मोस्ट अवेटेड ट्रेलरमध्ये(trailer) अजय देवगण, करीना कपूर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेक्षक भडकले आहेत. सिंघम अगेनच्या ट्रेलरमधील दीपिकाचा अभिनय पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्व बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावरील काही नेटिझन्सने दीपिका पदुकोणच्या अभिनयावर टीका केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत पण दीपिकाच्या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिका अभिनय आणि फेक ॲक्सेंटमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे..

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आता दीपिका पदुकोणची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. आगामी सिंघम अगेन चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण शक्ती शेट्टी या पोलिसाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दीपिका पदुकोणला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची निराशा झाली आहे. शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दीपिका ओव्हर ॲक्टिंग आणि फेक अक्सेंट वापरत असल्यामुळे तिची भूमिका कमकुवत दिसत होती, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा:

नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री ‘या’ राशींना पावणार!

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच…