इचलकरंजी येथील आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ११ महिन्यांपूर्वी (month) इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी 11 महिन्यांच्या अल्पकालावधीत अनेक कामे मार्गी लावली. कृष्णा जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्यांच्या कार्यकाळातच झाला.
तसेच मोठ्या तळाचे सुशोभीकरण करण्याचे काम त्यांनी युद्ध पातळीवर सुरू केले. अशातच त्यांची बदली काल करण्यात आली आणि महापालिकेचे आयुक्त म्हणून श्रीमती पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली तडकाफडकी झाली होती. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॅट कोर्टात दाद मागितली होती. त्यात त्यांना यश देखील आलेले आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे पुन्हा एकदा इचलकरंजी महानगरपालिकेचा पदभार सांभाळणार आहेत.
हेही वाचा :
सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण
मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले “ नावं घेऊन तुमचे उमेदवार पाडणार”