उत्तर भारताचा कल कही खुशी, कही गम!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उत्तर भारतातील जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा काँग्रेस(congress) आणि भाजपसाठी कही खुशी ,कही गम अशा प्रकारचा आहे. जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हे काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्री होतील तर हरियाणा मध्ये भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. या दोन राज्यांच्या निवडणूक निकालांचा महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे मात्र या निवडणूक निकालांचा महाराष्ट्राच्या सत्ता कारणावर थेट परिणाम होईल असे अनुमान काढणे घाईगडबडीचे ठरेल.

काश्मीरला विशेष अधिकार बहाल करणारे कलम 370 हे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए सरकारने बरखास्त केल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेच्या पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर जिंकणे हे उद्दिष्ट ठरवले होते. त्यासाठी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील जनतेला विविध प्रकारची आश्वासने देऊन आश्वासित केले होते.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक जिंकली तर कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. याची सुद्धा टेस्ट या निवडणुकीत घेतली गेली होती. तथापि काश्मीर खोऱ्यात भाजपाला फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र जम्मू खोऱ्यात चांगले यश मिळालेले आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय जनता पक्षाला तेथील जनतेने नाकारले म्हणजे 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध सामान्य मतदारांनी दिलेला तो कौल आहे असे म्हणता येणार नाही.

काँग्रेसशी(congress) युती करणाऱ्या ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गेल्या पाच वर्षात तेथे चांगली तयारी केली होती. भाजप आणि मेहबूबा मुफ्ती या दोघांच्या विरुद्ध ओमर अब्दुल्ला यांनी चांगली आघाडी उघडली होती. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मेहबूबा यांच्या पीडीपीला काश्मीर खोऱ्यातील सर्व सामान्य मतदारांनी नाकारले आहे. मेहबूबा यांच्या कन्येचा तेथे दारूण पराभव होतो यावरून त्यांच्या विरुद्ध किती जनमत होते हे लक्षात येऊ शकेल.

एकेकाळी काश्मीर खोऱ्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. बराच काळ तेथे काँग्रेसचे(Congress) सरकार होते. पण गेल्या काही वर्षात काश्मीर खोऱ्यामधील काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला आहे. यंदाच्या निवडणुकीतही नॅशनल कॉन्फरन्स च्या तुलनेत काँग्रेसला फारश्या जागा मिळालेल्या दिसत नाहीत. मेहबूबा मुफ्ती या केव्हाही भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधतील, त्यांचे राजकारण भरवशाचे नाही असा विचार काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य मतदारांनी केलेला दिसतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर साठी मोठ्ठा निधी दिला होता. 370 कलम रद्द झाल्यानंतर बाहेरच्या गुंतवणुकी या खोऱ्यात येऊ लागल्या होत्या. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या. याचा फायदा या निवडणुकीत होईल असे आडाखे भाजपच्या नेत्यांनी बांधले होते. प्रत्यक्षात मात्र भाजपाला या खोऱ्यात फायदा झालेला नाही.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीकडे पाकिस्तानचे लक्ष वेधून राहिले होते. कोणत्याही स्थितीत काश्मीरमध्ये भाजपची सत्ता येता कामा नये यासाठी पाकिस्तान मध्ये प्रार्थना केल्या जात होत्या. काश्मीरच्या निकालामुळे दहशतवादी संघटना तसेच पाकिस्तान यांना निश्चितच आनंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता स्थगत करता आली नाही. भाजपची पीछेहाट झाली. त्यामुळे हरियाणा मध्ये भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही. अशी अटकळ राजकीय विश्लेषकांनी बांधली होती. एक्झिट पोलही असेच काहीसे सांगत होते. मात्र भारतीय जनता पक्षाने हरियाणात आपल्या विजयाची पताका लावली आहे. इथे काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होतील आणि पुन्हा भाजप मागे जाईल असे वातावरण होते. प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकलेला दिसतो असे म्हणता येईल. दोन्ही राज्यातील निवडणुकांच्या निकालावर महाराष्ट्रातून सावध प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात मात्र संजय राऊत हे हरियाणा मध्ये काँग्रेसचे सत्ता येणार असे सायंकाळपर्यंत म्हणत होते. काँग्रेस पेक्षा त्यांचाच जास्त भ्रमनिरास झालेला आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा:

हर्षवर्धन पाटील यांचं संधी साधू राजकारण!

डिसेंबरपर्यंत ‘या’ 3 राशी जगणार राजासारखं जीवन

‘भूल भुलैया 3’चा डंका, कॉमेडीने भरलेल्या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज!