रील्स शूट करण्याच्या नादात महिला कोसळली दरीत व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही काळात सोशल मीडियाचा वापर कमालिचा वाढला(viral) आहे. हल्ली जो तो सोशल मीडियावर रील्स पाहाता दिसतो. बरं, हे व्हिडीओ व्हायरल झाले अन् लाखो लाखो व्ह्यूज मिळाले तर तुम्ही प्रसिद्धीसोबतच चांगले पैसे देखील कमवू शकता. त्यामुळे सध्याची तरुणाई मैदानी खेळांऐवजी दिवसभर मोबाईलवर खेळताना अधिक दिसते. पण ही सतत रील्स तयार करण्याची सवय काही वेळेस जीवघेणी देखील ठरू शकते.

अन् याचिच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडीओ(viral) समोर आला आहे. रील्स बनवण्याच्या नादात दरीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जीवघेण्या रील्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील अवाक् व्हाल.

मीडिया रिपोर्टनुसार छत्रपती संभाजीनगरमधील शुलीभंजन या ठिकाणी ही घटना घडली आहे. तर त्याचं झालं असं की, एक महिला गाडी चालवताना व्हिडीओ तयार करत होती. पण रील्समध्ये एक्सप्रेशन्स देण्याच्या नादात तिनं एक मोठी चूक केली. ब्रेक ऐवजी एक्सिलेटवर पाय ठेवला. परिणामी गाडी दरीत कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ @Nandupatil67 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दरीत पडल्यानंतर गाडीचा पार चक्काचूर झाला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्हिडीओ शूट करत असलेला व्यक्ती ब्रेक दाब ब्रेक दाब असं तिला ओरडून सांगत होता. पण तिचा पाय चुकून ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पडला. अन् त्यानंतर ती इकती गोंधळली की पाय ब्रेकवर दाबावा हे जणू तिच्या लक्षात आलंच नाही. अन् शेवटी ही गाडी दरीत कोसळली.

हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या प्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच डोंगराळ भागात किंवा सार्वजनिक ठिकाणी रील्स शूट करण्यावर बंदी घालावी अशी मागणी देखील काही जण करताना दिसत आहेत. असो, या घटना थांबवायच्या असतील तर काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं.

हेही वाचा :

११ लाखांची ‘फ्रॉडवाली लव्हस्टोरी’! त्याने तिला फसवलं अन् तिनेच

मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं

विधानसभेपूर्वी महायुतीत स्फोट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजप नेत्यांची मागणी?

पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, पण आपण वादळात दिवा लावला; धैर्यशील मानेंचा विरोधकांवर निशाणा