युद्ध भडकतय आखातात धग लागणार मात्र भारतात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हिजबुल नेता हसन नसरुल्लाह याचा इस्रायल ने केलेल्या लष्करी हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचे पडसाद भारतातल्या काश्मीर खोऱ्यात(gulf) उमटत आहेत. दोन दिवसापूर्वी इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरूटवर हल्ला केला त्यात हसन नसरुल्ला तसेच इराणचा एक कमांडर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इस्रायल विरुद्ध आखाती देश असा भडका उडण्याची शक्यता दिसते.

इस्रायल विरुद्धच्या संघर्षात अद्यापही इस्लामीक देशांनी भाग घेतलेला नाही. पण हे इस्लामिक देश युद्धात उतरणारच नाहीत असे नाही. जर का इस्लामिक देशांनी या युद्धात भाग घेतला तर संपूर्ण आखात पेटणार आहे. कदाचित ही तिसऱ्या महायुद्धासाठी धोक्याची घंटा सुद्धा असू शकते. सध्या गाझा पट्टी अर्थात पॅलेस्टाईन, सीरिया, इराण आणि लेबनॉन
यांच्या विरुद्ध इस्रायलने आघाडी उघडली आहे.

या युद्धात आणखी आखाती देश उतरले तर त्याचा थेट गंभीर परिणाम भारतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भारत हा आखाती देशांमधून 70 टक्के तेल आयात करतो. संघर्ष भडकला तर भारताच्या तेल आयातीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पेट्रोल डिझेलचे संकट येऊ शकते. तीन सारखा देश दोन महिने पुरेल इतक्या पेट्रोल आणि डिझेलचा साठा करू शकतो मात्र भारताकडे साठा करून ठेवण्याची फारशी क्षमता नाही. आणि म्हणूनच आखाती संघर्ष हा भारतासाठी चिंताजनक आहे.

आखाती(gulf) प्रदेशात युद्धाचा भडका उडण्याची सुरुवात हमास या दहशतवादी संघटनेकडून झाली. कारण या दहशतवादी संघटनेने पहिला हल्ला इस्रायल वर केला. एका रात्रीत हजारो क्षेपणास्त्र इस्रायलवर डागली आणि तेथून हा संघर्ष सुरू झाला. अगदी सुरुवातीला इस्रायल विरुद्ध हमास असे या संघर्षाचे स्वरूप होते. त्यानंतर सीरिया, इराण हे दोन देश या संघर्षात उतरले. आता लेबनानसुद्धा, त्यांच्यावर इस्रायल ने हल्ला केल्यामुळे तो देशही आता या संघर्षात उतरणार आहे.

हिजबुल नेता हसन नसरुल्ला आखाती देशांसाठी एक महत्त्वाचा घटक होता. तो बैरूट मध्ये एका खास बैठकीसाठी आला होता आणि तो ज्या इमारतीमध्ये होता तीच इमारत इस्रायलने हल्ला करून उध्वस्त करून टाकली. त्यामध्ये हा हेच बोल नेता आणि इराणचा टॉपचा कमांडर मारला गेला. त्यामुळे आखाती प्रदेश संतप्त झालेले आहेत.

उत्तर पर्शियन आखाताला (gulf)लागून असलेल्या देशांना आखाती देश म्हणतात. बहारीन, इराक, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया हे सात देश आखाती देशांमध्ये मोडतात. इराण वगळता इतर आखाती देश या युद्धात उतरलेले नाहीत. ते उतरले आणि इस्लामिक राष्ट्रांनी आखाती प्रदेशाला समर्थन दिले तर संपूर्ण आखात पेटणार आहे. आणि त्याची धग भारताला लागणार आहे.

एकूणच तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. इकडे आखाती प्रदेश युद्धग्रस्त आणि तिकडे रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या बाजूने नाटो देश उतरले तर रशिया स्वस्थ बसणार नाही त्यामुळे तिकडूनही नाटो विरुद्ध रशिया असा संघर्ष उभा राहील आणि तो तिसऱ्या महा युद्धाचा एक भाग असेल.

इस्रायल विरुद्ध सर्व आखाती देश असा भडका यापूर्वीही उडाला होता आणि त्यामध्ये इस्रायलने बाजी मारली होती. त्यानंतर बराच काळ आखाती प्रदेशात तशी शांतता होती. या शांततेचा भंग हमास या दहशतवादी संघटनेने केला आहे. अगदी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात युद्ध होते. इस्रायल विरुद्ध इराणने तसेच सिरियाने आघाडी उघडल्यानंतर त्याची व्याप्ती वाढली. आणि आता ती वाढतच चालली आहे. आखाती युद्ध तसेच रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध हे संपूर्ण जगासाठी अडचणीचे ठरणार आहे.

हिजबुल नेता हसन नसरुल्हा याची हत्या इस्रायलने केल्यानंतर त्याचे पडसाद काश्मीर खोऱ्यात उमटले आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्याचवेळी पीडीपीच्या नेत्यानी हसन नसरुला याच्या निधनाबद्दल मोर्चे काढून इस्रायलचा निषेध केला आहे. पीडीपीच्या नेत्या मुफती मेहबूब यांनी हसन नसरुल्लाह याला शहीद म्हटले आहे. एका दहशतवाद्याला शहीद म्हटल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरच्या निवडणूक प्रचारात आणला आहे.

हेही वाचा:

भाजपला मोठा धक्का! फडणवीसांच्या जवळचा ‘हा’ नेता तुतारी हाती घेणार

शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर गोळीबार

प्रियांका चोप्रा नादियाच्या भूमिकेत परतणार, ‘सिटाडेल सीझन 2’ कधी रिलीज होणार