समुद्राची लाट अन् क्षणार्धात संपूर्ण कुटुंब यमराजाच्या दारी! Video Viral

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसांत पर्यटनाला वेग येते. पावसाळ्यात(family) अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच बहरून येते ज्यामुळे अनेक पर्यटक अशा ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. मात्र या ऋतूत फिरताना आपल्या सुरक्षिततेची विशेष करून काळजी घ्यायला हवी. अनेकदा या ऋतूत काही ठिकाणे सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली जातात तरीही काही अतिउत्साही पर्यटक अशा ठिकाणी माजमस्तीसाठी जातात आणि स्वतःच जीव गमावून बसतात.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात समुद्राच्या(family) जोरदार लाटांमध्ये एक संपूर्ण कुटुंबच वाहून गेले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओतील मृत्यूचा हा थरार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हिडिओत पाहिले तर दिसते की, समुद्र चांगलाच खवळलेला आहे. या ऋतूत खरं तर समुद्रासारख्या ठिकाणी चुकूनही जाऊ नये मात्र एक कुटुंब आपला जीव धोक्यात घालवून या समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर उभे आहेत. यांनतर नेहमी प्रमाणे समुद्राच्या लाटा खवळतात आणि लाटांचा वेगवान प्रवाह किनारीच्या दिशेने येऊ लागतो. हा प्रवाह पाहताच काही लोक जे मागे कठड्यावर उभे होते ते लांब पळून जातात मात्र किनाऱ्याच्या अगदी काठोकाठ उभे असलेल्या कुटुंबाला तेथून पळण्याची आणि स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळत नाही आणि परिणामी तर लाटांच्या प्रभावात वाहून जातात.

कुटुंबाचे जीवघेणे पर्यटन त्यांना चांगलेच महागात पडल्याचे यातून दिसून येते. वाहून गेल्यानंतर या कुटुंबाचे काय झाले? ते अद्याप समजलेले नाही. मागेच कठड्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केल्याचे दिसून येते. याचा व्हिडिओ @radhekrishna_0555 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, कृपया पाण्याापासून दूर आहे. हे आयुष्य एकदा मिळते. आपल्या लोकांबरोबर सुरक्षित राहा” असे लिहिण्यात आले आहे.

दरम्यान आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पावसाळ्यातील पर्यटन किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळते. व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले असून काहींनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावर एका युजरने लिहिले आहे की, “हे लोक कधीही सुधारणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ”निसर्गासमोर कोणाचेही काही चालत नाही.”

हेही वाचा :

कोल्हापूरचे लोक प्रतिनिधी विकासाचा विचार करणार कधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार-शिंदे गटात जुंपली

दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी…