वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर नवरात्रीत लोकांच्या गरबा खेळतानाचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. सगळीकडे रंगीबेरंगी गरबा(dandiya) सुरू आहे. अगदी लहांनापासून मोठ्यांपर्यंत गरब्याच्या रंगात रंगले आहेत. दरम्यान असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याचा आहे.

या वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ दांडिया(dandiya) खेळतानाचा असून सध्या हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेजण चकित झाले आहेत. आजी-आजोबांची ही जुगलबंदी पाहून अनेकजण त्यांच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र वृद्ध जोडप्याची दांडिया जुगलबंदी सगळीकडे व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हॉलमध्ये सगळेजण गरबा खेळण्यासाठी जमलेले आहेत. सर्वजण छानछान तयार होऊन आले आहेत. काहीजण दांडिया खेळत आहेत तर काहीजण गरबा खेळताना दिसत आहेत. एक ठिकाणी एक वृद्ध जोडपे दांडिया खेळताना दिसत आहे. त्यांच्या खेळ पाहून अनेकजण त्यांच्याकडे पाहातच राहिले आहेत. काही वेळाने आणखी काहीजण गरबा खेळण्यासाठी येतात. आणि त्यांच्या सौबत गरबा खेळू लागतात. तसेच काहीजण याचा व्हिडिओ बनवताना देखील दिसत आहेत.

या वृद्ध जोडप्याचे हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर theghotalaguy या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओल आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आमि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, आजी-आजोबा मस्त खेळत आहेत, आजही त्यांच्या अंगात एवढी स्फूर्ती. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सर्वात सुंदर क्षण याशिवाय आणखी एका युजरने म्हटले आहे की, मीही अशा क्षणाला पात्र आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, यार, दोघेही खूप छान गरबा खेळत आहेत.

हेही वाचा:

‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

पैशाच्या वादावरून मायलेकाला बेदम मारहाण; महिलेचा हातच मोडला

करोडोंची कार चालवत होता गेला तोल, गाडीचा चक्काचूर अन् थरकाप उडवणारा Video