इचलकरंजी येथील नागरीवस्तीतून वाहणारा काळ्या ओढ्यामध्ये (clean)गेल्या कित्येक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचरा व इतर टाकावू साहित्य टाकल्यामुळे संपुर्ण ओढयाला कचऱ्याचा विळखा बसला होता.तसेच या काळ्या ओढा परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी साचली होती. त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
काळा ओढा परिसरात साचलेला(clean) प्लास्टीक कचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने हटविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी सदर काळ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा पूर्णपणे हटवावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्यावतीने जेसीबीच्या(clean) सहाय्याने ओढ्यातील मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टीक कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ओढा प्रवाहीत करण्याचे काम सुरू आहे. काळ्या ओढ्यातील संपूर्ण कचरा काढून स्वच्छ व कायमस्वरूपी प्रवाहीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचा :
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ
सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…
सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं