तरुणाने कपडे काढून महिलेला व्हिडिओ कॉल केला अन् नंतर ब्लॅकमेल होताच जीवही दिला

मंगळवेढा शहर परिसरात एका तरुणाला ऑनलाईन व्हिडिओ कॉल बाहेरच्या राज्यातून आला. यामध्ये एका (woman)महिलेने त्याला बाथरुममध्ये जाऊन नग्न होऊन व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडला. सातत्याने होत असलेल्या अशा प्रकारामुळे त्या तरुणास मानसिक धक्का बसला. त्यानंतर आत्महत्या करून जीवन संपवले.

मंगळवेढा परिसरातील एका तरुणाला शुक्रवारी (दि.3) सकाळी 8 वाजता फेसबुकवर व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला दिला. सदर (woman)महिलेने बाथरुममध्ये जाऊन नग्न होऊन व्हिडिओ कॉल करावयास सांगितले. मुलाने त्या महिलेचे ऐकून नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला. दरम्यान, हे कृत्य सदर महिलेने रेकॉर्डिंग करुन त्या तरुणास पैशांची मागणी केली.

अन्यथा तुझ्या नातेवाईकांना हा व्हिडिओ कॉल पाठवून बेइज्जत करण्याचा इशारा दिला. हा मानसिक धक्का त्याला सहन न झाल्याने त्या मुलाने एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. घरच्यांनी सदर मुलाची वाट पाहून तो न आल्याने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, बाहेरच्या राज्यातील असे व्हिडिओ कॉल करण्याचा सल्ला कोणी दिल्यास त्यास बळी पडू नये. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. फेसबुकवर बाहेरच्या राज्यातील महिलांचे कॉल येत असतात. त्याला प्रतिसाद न देता तरुणांनी दक्ष रहावे. चुकून एखाद्या महिलेने धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.

आत्महत्येनंतर तीन-चार दिवसांनी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगल्याने ही घटना उघड झाली. सध्या व्हॉटसअप, फेसबुकचा जमाना असून प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल दिसून येत आहे. बाहेरच्या राज्यातील महिला मुलांना आकर्षित करण्यासाठी असे व्हिडीओ कॉल करुन पैशाची मागणी करतात.

पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची व बदनामी करण्याची धमकी देतात. याला तरुणांनी बळी न पडता अशी धमकी मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ड्रॅगनला जगात विनाशच घडवायचा आहे का? ‘या’ मोठ्या कारणामुळे नासाने दिला निर्वाणीचा इशारा

हेही वाचा :

धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ …आता ओबीसी उतरले रस्त्यावर …

मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्…

करोडो शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या बातम्या, कृषीमंत्र्यांनी बजेटपूर्वी ठेवल्या ‘या’ मागण्या