तरूण बाईकवर स्टंट करत कूल बनण्याचा करत होता प्रयत्न अन्… Video

सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. आपल्याला स्टंटचे अनेक व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर पाहायला मिळतात. विशेषत: तरूण मंडळींचा यामध्ये समावेश असतो. तरूण मुले-मुली इतके धोकादायक स्टंट करतात की, यामध्ये अनेकांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. असे जीवघेणा स्टंट करताना लोक स्वत:चा जीव तर धोक्यात घालतातच पण अनकदा इतरांचा जीव देखीव धोक्यात घालतात.

कोणी कार घेऊन स्टंट करते तर कोणी डोंगराच्या टाकडीवर लटकून योगा करतो. कोणी उंच टेकडीवर सेल्फी काढायला जातो तर कोणी आगीसोबत स्टंट करताना दिसतो. अशा स्टंट मधून लोकांपर्यंत चुकीचा संदेश पसरतो. तरीही अशा लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरूणाला बाईक स्टंट करणे महागात पडले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये(Video) तुम्ही पाहू शकता की, एका रिकाम्या रस्त्यावर तरूण सुसासट बाईक चालवताना दिसत आहे. बाईक चालवताना तरूण अचानक उभा राहतो. मग दोन्ही पाय बाईकच्या सीटवर ठेवून बॅलेन्स करायचा प्रयत्न करतो. एका हाताने बाईकचा तोल संभाळत तो बाईकवरर उभा राहतो.

मग दुसरा होत सोडून सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी अचानक बाईकचा तोल जातो आणि तो जोरात काली पडतो. तो बाईक पकडण्याच्या प्रयत्नात फरपटत जातो. त्याची बाईक शेतात जाते. हा व्हिडिओ काढणारा गाडी थांबवतो. मात्र त्यानंतर त्या मुलाचे काय झाले हे अद्याप कळालेले नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म arariya_wala_0863 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एका क्षणातच वातावरण बदलेले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ पक्षी उडाला नाही पण तुम्ही उडालात, तर आणखी एका युजरने त्या मुलाला काही झाले तर नाही असा प्रश्न विचारला आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, त्या स्टंटच्या नादात बाईक चांगलीच अद्दल घडली आहे. तर कांहीनी यामुळे इतरांनी शिकण्याची गरज आहे की, असे स्टंट करणे किती धोकादायक आहे.

हेही वाचा:

अभिजात भाषा ठरली आमुची मराठी जिंकली!

श्री अंबाबाईची विजयादशमी निम्मित रथारूढ पूजा

कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’