‘आज की रात’ गाण्यावर तरूणाचा जबरदस्त डान्स…Video Viral

सोशल मीडियावर आपल्याला रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. बऱ्याचवेळा आपण असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आश्चर्यचा धक्का बलतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी भांडणाचे, कधी डान्स (dance)रील्स, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ आपण पाहतो. याशिवया सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आपली कला दाखवत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एक कला दाखवण्याचे माध्यम लोकांसाठी बनले आहे.

सध्या डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांच्या अनेक डान्स(dance) व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक तरूणाचा आज की रात गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तरूणाचा डान्स पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका क्लबमध्ये पार्टी सुरू आहे. तिथेच एक मुलगा आणि मुलगी डान्स करताना दिसत आहे. स्त्री 2 हा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. या चित्रपटातील गाण्यावर ते दोघे डान्स करत असतात. तरूण अचानक एक जबरदस्त स्टेप करतो ते पाहून मुलगी आश्चर्यचकित होऊन बाजूला जाते.

तरूणा त्याचा डान्स सुरूच ठेवतो. तरूणाने या गाण्यावर अप्रतिम स्टेप्स केल्या आहेत. गाण्याच्या प्रत्येक बोलावर स्टेप्स करत आहे. या तरूणाचा डान्स पाहून तेथे उपस्थित इतरजण त्याला प्रोत्साहित करत आहेत. या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @gajender_gajju या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत अनेकांनी या तरूणाचे कौतुक केले आहे.

एका युजरने म्हटले आहे की, याने तरू मुलींपेक्षाही चांगला डान्स केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तमन्ना भाटिया देखील याच्या पुढे फिकी पडेल, आणखी एका युजरने म्हटले आहे की, आम्ही मुले देखील कशातच कमी नाही, तर एकाने म्हटले आहे की, भाऊ तु खूप छान डान्स केलास, सलाम तुला स्टेप्स लक्षात राहिल्या. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा:

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

खिलाडी कुमारचा ‘सरफिरा’ सिनेमा या दिवशी OTT वर होतोय रिलीज!

दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या