भरुन आलेला उर डोळ्यात अश्रू छावा पाहिल्यानंतर तरुणीच्या शिवगर्जनेने चित्रपटगृह दणाणलं पाहा VIDEO

सध्या सगळीकडे छावा या चित्रपटाची चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (theater)आयुष्यावरील हा चित्रपट सर्वांनाच भूरळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि त्यांनी दिलेले बलिदान हे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे. छावा चित्रपट पाहताना प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन येतो आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतात. छावा चित्रपट पाहताना अनेकांना अश्रू अनावर होतात. चित्रपटगृहातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

छावा चित्रपट पाहायला गेलेल्या एका प्रेक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट संपल्यावर एक मुलगी उठून स्क्रीन समोर जाते आणि मोठ्या आवाजात शिवगर्जना देताना दिसत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत ही मुलगी आस्ते कदम, आस्ते (theater)कदम, आस्ते कदम,. ‘ प्रौढ प्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावंस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज महाराज श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ अशा शब्दात महाराजांचा जयजयकार करत आहे. हा व्हिडिओ पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो.

‘शिवरायांचा छावा’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार (theater)धडक, ४ दिवसांत केली बक्कळ कमाईया व्हिडिओत ही मुलगी शिवगर्जना देताना तिला दम लागत आहे. परंतु ती एकदाही थांबली नाही. तिच्यासोबतच चित्रपटगृहातील सर्व लोक उठून उभे राहिले आपापल्या छातीवर हात ठेवून शिवगर्जना म्हणायला लागले. संपूर्ण चित्रपटगृहात फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे नाव घुमत होते. तर प्रेक्षकांमध्ये अनेकांचे डोळे पाणावलेले होते. प्रत्येकजण रडत होता. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल.

हेही वाचा :

‘या’ लाडक्या बहिणी अपात्र! आठवा हफ्ता मिळणार नाही

भारतात स्वस्तात मिळणार अमेरिकन बॉर्बन व्हिस्की

शरद पवार यांना भाजपकडून धक्का? अनेक वर्षे शरद पवारांसोबत असलेला नेते भाजपमध्ये जाणार