पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एकदिवसीय वर्ल्ड कप(cricket) आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान भारतीय गोलंदाजांबद्दल केलेल्या तर्कहीन विधानांवर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी शमीला चांगलाच प्रत्युत्तर दिला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये(cricket) भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बॉल कुरतडून रिव्हर्स स्वींग केल्याचा दावा इंझमाम-उल-हकने केला होता. शमीने यावर टीका करताना इंझमाम-उल-हकला उपहासात्मक उत्तर दिलं. “ते आपल्याबद्दल कधीच समाधानी नसतात आणि यापुढेही नसतील. मला वर्ल्ड कपमध्ये वेगळा बॉल देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मी तो बॉल घरी ठेवला आहे, आणि कदाचित एखाद्या दिवशी मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन आहे की नाही ते दाखवेन,” असं शमीने म्हटलं.
शमीच्या या वक्तव्यावर पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू बाशीत अली यांनी त्याला इशारा दिला आहे. “इंझी भाई काही चुकीचं बोललेत असं तुला वाटलं तर तू ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतोस. उगाच त्यांना कार्टून वगैरे बोलण्याची गरज नाही. ते वरिष्ठ असून त्यांचा थोडा तरी मान ठेवायची तसदी घे,” असं बाशीत अली यांनी म्हटलं.
मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिले होते. शमीच्या अनुपस्थितीत त्याची टीका आणि इंझमाम-उल-हकच्या आरोपांमुळे क्रिकेट जगतात तणाव वाढला आहे.
हेही वाचा :
आज ‘या’ 5 राशींचं नशीब पालटणार, इच्छित गोष्टी साध्य होणार
“महाराष्ट्रातील सरकार शेठजी-भटजींचे..”,श्याम मानव यांचे टीकास्त्र
ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धा: पदकाची आशा घेऊन सहा भारतीयांचा सहभाग