कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकनाथ शिंदे(political news)यांना सोबत घेऊन बहुमत मिळाल्यावर, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजितदादा पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती? अशा शब्दात केव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑब्झर्वर आणि साप्ताहिक विवेक ने भाजपला फटकारले होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पुन्हा अजितदादा उपमुख्यमंत्री बनले आहेत. तेव्हा म्हणाले हा असंगाशी संग कशासाठी? आता काय म्हणणार आहे संघ? अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत.
कमाल पातळीवर नैतिकता जपणारे राजकारण कधीकाळी या महाराष्ट्रात (political news)केले जायचे. आता किमान पातळीवरही नैतिकता पाळली जात नाही. म्हणूनच सामान्य माणूस सध्याचे राजकारणही आता फारसे गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मजबूत पक्ष फुटल्यानंतर किंवा फोडल्यानंतर सर्वसामान्य जनतेला आश्चर्याचे, सखेद आश्चर्याचे तीव्र स्वरूपाचे धक्के बसले होते.
आता याच्यापेक्षा मोठे धक्के असूच शकत नाहीत अशा मानसिकतेत गेलेल्यांना राजकारण्यांनी केलेल्या गौप्य स्फोटाचेही कौतुक राहिलेले नाही. म्हणूनच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात अजितदादा पवार यांची जप्त केलेली सुमारे एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता संबंधित यंत्रणेकडून त्यांना परत करण्यात आली, त्याचेही लोकांना काही वाटले नाही.
पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आले होते तेव्हा त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित दादांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली. पण ते सरकार कोसळल्याने त्याची चर्चा फारशी झाली नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातही त्यांना क्लीन चीट मिळाली. त्याचेही लोकांना आश्चर्य वगैरे वाटले नाही. सत्तेच्या वर्तुळात गेले की, ईडीची भीती वाटत नाही, आय टी ची दहशत बसत नाही, रात्री मग शांत झोप लागते. हे महाराष्ट्रातील काही नेत्यांनीच लोकांना अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.
नरेंद्र मोदी यांनी अजितदादा पवार यांचे नाव न घेता तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याची चर्चा भोपाळ येथील एका मेळाव्यात केली होती आणि अवघ्या काही दिवसात अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भारतीय जनता पक्षाच्या मांडवाखाली, पंखाखाली जाणे पसंत केले. तेव्हा लोकांना धक्का बसला. पण आता तो इतिहास झाला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कारवाई झाली होती. ते सध्या राहत असलेला मुंबईतील आलिशान फ्लॅट तसेच काही प्राईम लोकेशन मधले दुकान गाडे आयटीने जप्त केले होते. आता ही जप्तीची कारवाई मागे घेतली तर आश्चर्य वाटायला नको.
महा विकास आघाडीचे(political news) सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा भूखंड घोटाळा पुराव्यासह उघडकीस आणला होता. या घोटाळ्याचा संबंध थेट दाऊद इब्राहिम आणि दहशतवादी संघटनांशी जोडण्यात आला होता. नवाब मलिक यांना ते मंत्री असतानाच जेल यात्रा झाली होती. आता मात्र हेच नवाब मलिक अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत याचा अर्थ नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्षांने मागच्या दाराने आत घेतलेले आहे असा होतो. नवाब मलिक यांना भारतीय जनता पक्षांने अशा पद्धतीने पावन केले तरी लोकांना त्याच्याबद्दल फारसे आश्चर्य वगैरे वाटणार नाही.
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, ही मंडळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणार आहेत. आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते होतेही. त्याबद्दलही लोकांना फारसे काही वाटत नाही. एकूणच लोकांना आता अशा प्रकारच्या राजकारणाची सवय झालेली आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते एकदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरला आले होते. त्यांची शासने मैदानावर जाहीर सभा झाली होती. त्यात त्यांनी काँग्रेस राजवटीमध्ये झालेल्या प्रचंड महागाईचा उल्लेख जोरदार शब्दात केला होता. पुन्हा तुम्ही काँग्रेसलाच सत्तेवर आणले तर महागाई स्वीकारण्याची तुम्हाला सवय होईल आणि अशा प्रकारची सवय चांगली नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते. थोडाफार फरक करून सध्याच्या राजकारणाची सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला आता सवय झाली आहे. असे म्हणता येईल.
हेही वाचा :
Shocking Video: बापरे! डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळली
अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद
शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण