चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या सुटकेला नकार देत सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरुण गवळी याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात(Supreme Court) सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राज्य सरकारने ही याचिका दाखल करण्यात आली होती. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी ही एक धोरणात्मक बाब आहे. हायकोर्टाने २००६ च्या धोरणावर विश्वास ठेवत हा निर्णय दिला असल्याचे नमूद करत सुप्रीम कोर्टाने अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निकालामुळे अरुण गवळी याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ साली गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या गुन्ह्यात गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण, वय झालेल्या आणि शरीराने अशक्त असलेल्या कैद्यांना मुदतपूर्व सोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या २०१६ च्या धोरणाचा आधार घेत गवळीने सुटकेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली होती.

हेही वाचा :

मध्यवर्ती कळंबा कारागृहात वर्षभरात झाल्या दोन हत्या!

भर पार्टीत जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडला भरवला घास : Video Viral

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून ‘महायुती’मध्ये वाद…