सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(video) आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अनेकदा काही संतापजनक असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमचा राग अनावर होईल. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडिओ(video) नवरा-बायको संबंधित आहे. जसे नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असणे म्हत्त्वाचे आहे तसेच एकमेकांबद्दल आदर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण अनेकदा काही लोक आपल्या जोडीदाराला वाईट वागणूक देतात. विशेष करुन महिलांसोबत अनेकदा गैरवर्तन केले जाते. जरी देश प्रगत झाला असेल तरी अजून संपूर्ण जगभरात आजही अशा काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधितच आहे. या व्हिडिओमध्ये नवरा आपल्या बायकोसोबत भर रस्त्यात गैरवर्तन करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे बाईकवरुन चालले आहे. नवरा बाईक तालवत असून बायको मागे बसलेली आहे. त्याच वेळी अचानक गाडी चालवताना नवऱ्याचातोल जातो. यामुळे दोघेही जोरात खाली पडतात. खाली पडलयामुळे त्यांना थोडेसे लागते. मात्र, पुढे जे घडले ते पाहू तुम्हाला संताप येईल. नवरा या सगळ्याचा राग बायोकवर काढतो आणि तिला मारतो. तिचे केस जोरात ओढतो आणि तिला त्रास देतो.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @motivonememe या अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. सुंदर दिसणारा नाही, तर तुमचा आदर करणारा पार्टनर निवडा असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
तसेच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी संताप व्यक्त करत अशी लोकांना चांगली शिक्षा दिली पाहिजे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ती अशी वागणूक सहन कशी करु शकते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या अशा माणसांमुळेच चांगली पुरुष देखील बदनाम आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
हेही वाचा :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?
काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट
भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?