मध्यवर्ती कळंबा कारागृहात वर्षभरात झाल्या दोन हत्या!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मध्यवर्ती कळंबा कारागृहातील प्रशासनाबद्दल वारंवार(mumbai) प्रश्नचिन्ह उभा राहिले जात असून, तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. रविवारी या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका वृद्ध कैद्याची पाच जणांनी हत्या केली. या कारागृहात कैद्याची हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे मध्यवर्ती कारागृह वारंवार चर्चेत येत राहिले आहे. आणि सर्वात असुरक्षित कारागृह अशी त्याची ओळख निर्माण होताना दिसते आहे.

मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार गुप्ता हा मुंबई (mumbai) बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी असून तो गेल्या दहा-बारा वर्षांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी पाण्याच्या हौदाजवळ त्याचे आणि इतर पाच कच्च्या कैद्यांचे भांडण झाले. एकाने ड्रेनेजवरील लोखंडी झाकण त्याच्या डोक्यात मारले. तो जागीच ठार झाला.

एक वर्षांपूर्वी कोल्हापुरातील फिरंगाई तालीम परिसरात राहणारा निशिकांत कांबळे हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याची कारागृहातही गुंडगिरी सुरू होती. त्याच्या गुंडगिरीला कंटाळून इतर काही कैद्यांनी त्याची बेदम मारहाण करून हत्या केली होती. कारागृहात कैद्याकडून कैद्याची हत्या होण्याचा हात दुसरा प्रकार असल्यामुळे कारागृह प्रशासनाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामान्य कारागृह, जिल्हा उप कारागृह, आणि मध्यवर्ती कारागृहाच्या आतील मोकळ्या परिसरात कमालीच्या पातळीवर स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे. मोकळ्या आवारात पत्र्याचा तुकडा, लोखंडी खिळा, दगड, विटा या वस्तू असता कामा नयेत. कारण अशा वस्तू कोणत्याही क्षणी हत्यार म्हणून कैद्यांना वापरता येऊ शकतात. म्हणूनच कारागृहातील मोकळे आवार स्वच्छ असले पाहिजे. ज्या वस्तूचा हत्यार म्हणून वापर करता येईल तशी वस्तू सापडता कामा नये. यासाठी आवारातील स्वच्छता दररोज काटेकोरपणे ठेवली जाते.

मध्यवर्ती कळंबा कारागृहात ड्रेनेज लाईन आहे. या लाईन वर अनेक ठिकाणी झाकणे आहेत(mumbai). ती कोणत्याही कैद्याला अगदी सहजपणे काढता येणार नाहीत इतकी ती भक्कमपणे लावली जातात. आतील ड्रेनेज पाईपलाईन वरील एक झाकण एका कैद्याने अगदी सहजपणे काढले आणि ते मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान या जन्मठेपेच्या कैद्याच्या डोक्यावर हाणले. रक्तस्राव होऊन हा कैदी जागीच मरण पावला. हे झाकण घट्ट पणे बसवण्यात आले असते तर ते संबंधित कैद्याला काढता आले नसते. सहजपणे काढता येईल अशा पद्धतीचे झाकण लावल्यामुळे कळंबा कारागृहातील प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात अधून मधून अमली पदार्थ सापडतात, मोबाईल तर इतक्या प्रमाणावर आत्तापर्यंत सापडले आहेत की हे कारागृह आहे की मोबाईल शॉपी? असा प्रश्न सामान्य माणसाला पडावा.

फिरंगाई तालीम परिसरातील गुंड निशिकांत कांबळे याने कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांच्या भावाची हत्या केली होती. या प्रकरणात तो दोष मुक्त झाला होता. त्यानंतर त्याने दुसरी हत्या केली. त्यात त्याला जन्म ठेपेची शिक्षा झाली. त्याची तुरुंगात दहशत होती. तुरुंगातील काही कैद्यांना तो सतत माझ्यावर करायचा. त्यातून चिडून काही जणांनी त्याची हत्या केली. रविवारी झालेली ही या कारागृहातील दुसरी हत्या होय.

हेही वाचा :

महावितरणच्या कार्यालयांना आता ‘स्मार्ट मीटर’

 मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

मोठी बातमी! विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात 100 रोजगार मेळावे;