महायुतीचे सोलापूरचे उमेदवार(a good leader) राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत अग्रभागी असलेले माेहाेळचे आमदार राजन पाटील यांनी नुकतीच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोहोळचे माजी आमदार(a good leader) राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. ते महायुतीच्या प्रचारात देखील आहेत. मोहिते-पाटील गटाने महायुतीशी फारकत घेत नाईक निंबाळकरांना विराेध दर्शवित धैर्यशिल माेहिते-पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
राजन पाटील यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतली. अचानकपणे एकेकाळचे सहकारी आणि सध्या विरोधी गटात असणाऱ्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. लोकसभेची निवडणुकीत मुख्य उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर ही भेट झाल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :
काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव भाजपमध्ये प्रवेश करणार
सांगलीत फडणवीस – संंभाजी भिडे यांच्यात ‘गुफ्तगू’; संजयकाकांसाठी फिल्डिंग की…?
महायुतीला धक्क्यावर धक्के; शिंदे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा