गुंतवणुकीसाठी बँकेत पैसे तयार ठेवा. कारण पुढील महिन्यात गुंतवणूकदारांसाठी सुमारे 10 नवीन आयपीओ (IPO)घडणार आहेत. किमान 10 कंपन्या डिसेंबर 2024 मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. मर्चंट बँकर्सचा हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, डिसेंबरमध्ये विशाल मेगा मार्ट आणि ब्लॅकस्टोनची डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) लिमिटेड यासह 10 कंपन्या आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
मर्चंट बँकरने सांगितले की, यामध्ये शिक्षणावर फोकस असलेली नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) अवनसे फायनान्शियल सर्व्हिसेस IPO, टीपीजी कॅपिटलचा साई लाइफ सायन्सेस आयपीओ, हॉस्पिटल चेन ऑपरेटर पारस हेल्थकेअर आयपीओ आणि इन्व्हेस्टमेंट बँक डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स यांचाही समावेश आहे.
या कंपन्यांची योजना त्यांच्या आयपीओद्वारे(IPO) एकूण 20,000 कोटी रुपये उभारण्याची आहे. हे आयपीओ वेगवेगळ्या क्षेत्रांचे आणि आकाराचे असतील. यामध्ये नवीन शेअर्स आणि ऑफर फॉर सेल या दोन्हींचा समावेश आहे.
ब्रोकरेज हाऊस ट्रेडजिनीचे सीओओ त्रिवेश डी यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांनी बाजारात सकारात्मक भावना निर्माण केली आहे. यामुळे आयपीओ बाजाराला गती मिळेल. ते म्हणाले की 2024 हे वर्ष आयपीओसाठी मजबूत वर्ष ठरले आहे.
तसेच अलीकडे शेअर बाजाराला तेजीसाठी बराच संघर्ष करावा लागत आहे. आयपीओ द्वारे कंपन्या विद्यमान भागधारकांना बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी, विस्तार योजनांसाठी निधी उभारण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजांना समर्थन देण्यासाठी कंपन्या प्राथमिक बाजाराचा वापर करत आहेत.
याशिवाय पुढील महिन्यात आणखी तीन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. ज्यामध्ये सिक्युरिटी डायग्नोस्टिक, ममता मशिनरी आणि ट्रान्सरेल लाइटिंगचा समावेश आहे. या कंपन्या त्यांच्या आयपीओद्वारे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, यावर्षी, ह्युंदाई मोटार, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, बजाज हाऊसिंग फायनान्स, ओला इलेक्ट्रीट मोबिलीटी आणि फर्स्टक्रायची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्यूशन्स यासह 75 कंपन्यांनी मेनबोर्ड आयपीओद्वारे आधीच एकूण 1.3 लाख कोटी रुपये उभारले आहेत.
वर्ष 2023 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 57 कंपन्यांनी उभारलेल्या 49,436 कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम खूपच जास्त आहे. येत्या काही महिन्यांत 30 हून अधिक आयपीओ अपेक्षित आहेत. आयपीओ गुंतवणूकदारांनी गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये लक्षणीय नफा कमावला आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘या’ तारखेला 2100 रुपये मिळणार?, मुख्यमंत्र्यांची घोषणा
महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
“ठाकरेंचे पाच आमदार आमच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!