‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी(farmers) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आहेत. अशातच आता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी(farmers) पीएम किसान योजनेची नोंदणी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पीएम किसान लाभार्थी यादी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ही यादी तपासून त्यात तुमचे नाव तपासावे लागणार आहे. जेणेकरुन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे समजणार आहे.

पीएम किसान लाभार्थी यादी भारत सरकारने पीएम किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे, जी तुम्ही सर्वजण ऑनलाइन स्वरूपाने पाहू शकता.

अशाप्रकारे यादी तपासा? :
– सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल .
– यानंतर तुम्हाला त्याच्या मुख्य पृष्ठावर जावे लागेल.
– त्यानंतर लाभार्थीचा पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा
– यानंतर तुमचे राज्य निवडा आणि इतर आवश्यक माहिती देखील भरा.
– यानंतर गेट रिपोर्ट ऑप्शन दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करा.
– यानंतर पीएम किसान लाभार्थी यादी दिसेल. ती यादी तुम्ही डाऊनलोड करून तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता.

पीएम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? :

आधार कार्ड
बँक पासबुक
ओळखपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
जमिनीशी संबंधित कागदपत्रे

हेही वाचा :

मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार? ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी

पुरे झाली चर्चा… भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं