कोयता नाचवत १० घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा थरार CCTVत कैद

नाशिकच्या सातपूरमध्ये गाव गुंडाची दहशत पाहायला मिळतेय. सद्गुरू नगरमध्ये १२ गावगुंडांनी कोयते नाचवत (dancing) तोडफोड केल्याचं समोर आलंय. कोयते नाचवत केलेल्या तोडफोडीचा सिसीटिव्ही समोर आलाय. सद्गुरू नगरातील काठे अपार्टमेंटमधील इमारतीत तसेच परिसरातील दुकानांची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय.

इमारतीमधील १० घरांच्या काचा फोडल्याचं समोर आलंय, एका युवकाला मारहाण करण्यासाठी गुंड आले होते. मात्र, युवक न मिळाल्याने परिसरात कोयते मिरवत(dancing) तोडफोड करत त्यांनी दहशत माजविल्याची माहिती मिळतेय. परिसरातील रहिवाशांना कोयता दाखवत या गावगुंडांनी शिवीगाळ देखील केलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही तरूणांनी तोंडाला मास्क बांधलेले आहेत. ते हातात कोयते घेवून एका बिल्डिंगमध्ये घुसत आहे. काही घराच्या काचा तुटल्याचं देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. नाशिक शहरात या गावगुंडांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यांनी १० घरांच्या काचा फोडल्या असल्याची माहिती मिळतेय. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. नाशिक मागील काही महिन्यांपासून अनेक लहान-मोठे गुन्हे घडत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी आता गावगुंडाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी भूमिका घेतलेली आहे.

नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग सक्रिय झाली असल्याचं दिसतंय. या गँगकडून नागरिकांवर कोयत्याने हल्ले करण्याचे प्रमाण वाढलंय. कोयता गँगमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी संबंधित परिसरात भेट देत नागरिकांना धीर दिलाय. सातपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केलीय. परिसरातील नागरिक घबराटीखाली आहेत.

हेही वाचा:

‘नवरात्रीत संघर्ष व्हावा अशी माझी..’, राज ठाकरेंनी दिला इशारा

विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार! निवडणूक आयोगाचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा

आंघोळ करणाऱ्या महिलांचे ‘तो’ बनवायचा व्हिडिओ; कोट्यवधींची जमवली प्रॉपर्टी अन्…