अभिनेत्याच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला, 7 लाखांचा मुद्देमाल लंपास

कधी आपल्या अफेयर्समुळे तर कधी आपल्या चित्रपटामुळे चर्चेत राहणारा सलमान खानचा को-स्टार अभिनेता(actor) अरमान कोहली याच्या राहत्या घरात चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अरमान कोहली याच्या लोणावळ्यातील घरी चोरी झाली असून चोरट्यांनी घरातून रोख पैसे आणि सोन्याची चेन असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

अरमान कोहलीने(actor) याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असूून पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 25 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 दरम्यान लोणावळा हद्दीतील अभिनेत्याच्या कोहली इस्टेट, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथे चोरी झाली आहे.

या चोरी दरम्यान बेडरूममध्ये असलेल्या एक लाख रुपये आणि 12 तोळ्याची चेन असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरी झाली असल्याची माहिती कळताच अभिनेता आरमान कोहलीने लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सध्या या प्रकरणात अरमान कोहलीच्या घरी काम करणारे संशयित आरोपी आकाश (वय 21 वर्षे) व संदीप (वय 23) राहणार जौनपुर, उत्तर प्रदेश फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन या प्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे.

अभिनेता अरमान कोहली आतापर्यंत जानी दुश्मन, प्रेम रतन धन पायो सारख्या चित्रपटात दिसला आहे. याचबरोबर तो लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये देखील दिसला होता. या शोमध्ये त्याच्या अफेयरची चर्चा चांगलीच रंगली होती.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने केली मोठी घोषणा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार

मधूमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ?