‘आश्रम’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री (actress)अदिती पोहणकर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासातील खास अनुभव शेअर केला. या मुलाखतीत तिने बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीन बद्दल मोकळेपणाने बोलत, त्या काळात तिला आलेल्या भावनिक गुंतवणुकीचा आणि संकोचाचा खुलासा केला.

अदितीने(actress) स्पष्ट केलं की इंटिमेट सीन्स शूट करणं तितकं सोपं नसतं. त्या वेळी दोन्ही कलाकारांमध्ये कम्फर्ट लेव्हल, विश्वास आणि संवाद अत्यंत महत्त्वाचे असतात. इम्तियाज अली यांचा उल्लेख करत तिने सांगितलं की, इंटिमेट सीन शूट करताना सहकलाकाराची सुरक्षितता आणि मानसिक स्थिती याची सातत्यानं काळजी घ्यावी लागते.
‘आश्रम’च्या सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर नसतानाही त्यांनी हे सीन्स अत्यंत सन्मानपूर्वक आणि समजूतदारपणे पूर्ण केले. ती म्हणाली, “कधी कधी सीनच्या मध्ये कट झाल्यावरही आम्ही तीच पोझिशन ठेवावी लागायची, त्यामुळे एकमेकांशी सतत विचारपूस करत असायचो – तू ठीक आहेस का?” अशा सीनसाठी केवळ तांत्रिक तयारी नाही, तर मानसिक समजूतही महत्त्वाची असते.
यावेळी ती म्हणाली की, दोन कलाकारांमध्ये भावनिक दुरावा नसला, तर ऑनस्क्रीन कम्फर्ट सहजपणे प्रेक्षकांना जाणवतो. “शूटिंगदरम्यान मैत्री झाल्यामुळे संकोच दूर झाला. जर कलाकारांमध्ये बाँडिंग नसेल, तर ते पडद्यावरही दिसून येतं,” असं ती म्हणाली.
‘आश्रम’च्या शूटदरम्यानचा एक मजेदार किस्सा शेअर करत अदितीने सांगितलं की, “एकदा मी बॉबी देओलचं लिट्टी-चोखा खाल्लं आणि नंतर त्याच्यासाठी ऑर्डर केलेली आलू टिक्कीही खाल्ली. त्याला ती खूप तिखट वाटली, आणि मग तीही मीच संपवली.” या छोट्या प्रसंगांमुळे त्यांचं नातं सहज, मोकळं आणि मैत्रीपूर्ण झालं, असं ती सांगते.

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल अदिती म्हणाली की, “जेव्हा दोघं कलाकार एकमेकांवर विश्वास ठेवतात, तेव्हाच सीनमध्ये ती रचना, ती भावना दिसते. शरीर भाषाही त्याप्रमाणे प्रतिसाद देते. सीमांचे भान ठेवून काम करणं हेच अभिनयाचं सौंदर्य आहे.”
तसेच तिने शेवटी असंही सांगितलं की, इंटिमसी को-ऑर्डिनेटर्सचा सल्ला योग्य असतो, पण कलाकारांमध्ये जर समज, संवाद आणि सुरक्षितता असेल, तर कोणताही सीन अधिक चांगल्या पद्धतीने चित्रित करता येतो. हे फक्त शारीरिक नव्हे, तर एक भावनिक अनुभव असतो.
हेही वाचा :
‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती; लग्नापूर्वी झाली ३४ मुलांची आई
इचलकरंजीत नवकार महामंत्र महाजपास हजारोंचा प्रतिसाद
बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर…