सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना तर ओळखणं देखील कठीण आहे. तर असाच एक अभिनेता (Actor)आहे. ज्यानं 2002 मध्ये एक हिट चित्रपट दिला. जो त्या वर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. पण तुम्हाला माहित आहे का की मोठं झाल्यानंतर त्या मुलानं एक-दोन नाही तर तब्बल 20 फ्लॉप चित्रपट दिले. पण आज तो सगळ्यात श्रीमंत कलाकारांपैकी एक मानला जातो. आजकाल त्याची नेटवर्थ ही 82 कोटी असल्याचं म्हटलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोण अभिनेता आहे?
हा अभिनेता(Actor) दुसरा कोणी नसून डीनो मोरिया आहे. डीनोनं मॉडेलिंग करत त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं 1999 मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत रिंकी खन्ना होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला. डीनो मोरियाच्या करिअरमधील अनेक चित्रपट हे फ्लॉप ठरले.
मात्र, त्यातही सगळ्यात जास्त कोणता चित्रपट हा हिट ठरला तर तो ‘राज’ आहे. हा चित्रपट हिट ठरला असला तरी देखील त्या आधी डीनोनं जवळपास 20 चित्रपट दिले. ‘गुनाह’, ‘इश्क है तुमसे’, ‘बाज’, ‘दस कहानियां’ आणि ‘हॉलिडे’ सारखे चित्रपट आहेत. मात्र, हे सगळे चित्रपट फ्लॉप ठरले. एकामागे एक असे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर डीनो मोरियानं चित्रपटांपासून स्वत:ला दूर केलं आणि ओटीटीच्या जगात पदार्पण केलं.
डीनो मोरिया अभिनयाशिवाय बिझनेस देखील करतो. त्याचं एक रेस्टॉरंट आहे आणि काही कंपन्यांमध्ये त्यानं गुंतवणूक केली आहे. त्यानं 2012 मध्ये महेंद्र सिंग धोनीसोबत त्यानं एक मर्चेंडाइजिंग कंपनी सुरु केली. त्याचं नाव ‘कूल माल’ आहे. त्याशिवाय त्याचं एक प्रोडक्शन हाउस असून ‘क्लॉकवाइज फिल्म्स’ असं त्याचं नावं आहे. ही कंपनी त्यानं 2013 मध्ये सुरु केली. इतकंच नाही तर डीनो मोरियाचा ज्यूसचा देखील बिझनेस आहे. त्यानं मिथिल लोढा आणि राहुल जैन यांच्यासोबत मिळून ‘द फ्रेश प्रेस’ नावानं एक कोल्ड-प्रेस्ड ज्यूस ब्रॅंडची सुरुवात केली. ही कंपनी कोणत्याही मशीनच्या प्रोसेसशिवाय फळांचा ज्यूस काढते.
हेही वाचा :
आज सोन्याचे दर वाढले, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर
‘या’ अभिनेत्याचा भयानक स्टंट: चेहऱ्यावर ओतले जळते मेण, व्हिडीओ व्हायरल
विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात