भारतात बनतीये मलेरिया वर ‘ही’ प्रभावी लस

मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा (medicine) अभाव आणि मलेरिया च्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे कठीण होत आहे.

पण आता या आजारावर प्रभावी औषध बनण्याची शक्यता दिसत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू,दिल्ली) शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने मलेरियाविरुद्ध लसीच्या निर्मितीसाठी आशादायक संशोधन केले आहे. या संशोधनामुळे आजारावर लसी तयार करण्यासाठी नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

प्रा. शैलजा सिंह आणि प्रा. आनंद रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील विशेष आण्विक औषध केंद्रातील (स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिन) शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या जंतू आणि मानवी शरीराच्या पेशींमध्ये होणारा बदल समजून घेतला आहे. इस्सेन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारे ‘पीएचबी2’ (प्रोहिबिटिन) हे जंतूंचे प्रथिन लसी बनवण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधकांचे मत आहे.

प्राध्यापकांनी पुढे सांगितले की, “कोविड-19 रोग्याच्या वाढीमुळे मलेरिया संशोधनात काही काळ खंड पडला होता. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढला. पण हा नवीन शोध जंतुंमध्ये निर्माण होणाऱ्या औषधप्रतिकारशक्तीशी लढण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याची आशा निर्माण करत आहे.”

जेएनयूच्या या संशोधनामुळे भविष्यात मलेरियावर प्रभावी लस मिळेल अशी आशा आहे.

हेही वाचा :

दुष्काळाची भीषण स्थिती;राज्यभरात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा संकट

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं?

‘भविष्यात आपल्या कोणाकडेही जॉब नसेल’; इलॉन मस्क नेमकं काय म्हणाले?