मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना(Yojana) महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा अनेक महिलांना लाभ मिळाला. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यांत एक कोटी 59 लाख लाभार्थ्यांना चार हजार 787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र, योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना दिलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या(Yojana) या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देऊ शकणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केले होते. त्यातील 26 अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.
हेही वाचा:
पुण्यातील मानाचे 5 गणपती; दर्शनासाठी राज्यभरातून भक्तांची मोठी गर्दी
कुत्र्याला अंगावर चढून महागात पडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा साजरा