या वर्षी पावसाळ्यात 100 ठिकाणी पाणी तुंबणार!

पावसाळा सुखकर जावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, गटारांची दुरुस्ती, नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यासाठी कोटय़वधी खर्च केला जात असतानाही या वर्षी पावसाळ्यात तब्बल 98 ठिकाणी पाणी(water) तुंबण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. याबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून पाणी तुंबणाऱया ठिकाणांची यादीच तयार करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना या वर्षी पावसाळय़ात मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाप्रलयानंतर पाणी(water) तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी 2006 पासून ‘ब्रिमस्ट्रोवॅड’ उपक्रमांतर्गत पालिकेच्या माध्यमातून पाणी तुंबण्याचे प्रमाण, ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र दरवर्षी पाणी तुंबणारी ठिकाणे वाढत असून नवी ठिकाणेही तयार होत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पाणी तुंबणाऱया ठिकाणी उपशासाठी एकूण 480 उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात येत आहेत. याशिवाय पालिकेने आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड आणि जुहू या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारली आहेत. या ठिकाणी प्रत्येक सेपंदाला हजारो लिटर पाणी उचलून समुद्रात फेकण्याचे काम केले जात आहे. मात्र समुद्रसपाटीपासून खोलगट भागात वसलेल्या मुंबई शहरातील अतिवृष्टीत जमा होणारे पाणी समुद्राला भरती आल्यास विसर्गाला अडथळा झाल्यामुळेही पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.

असे होतेय काम
पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तसेच पाणी तुंबण्याच्या समस्यांपासून कायमस्वरूपी दिलासा मिळण्यासाठी कामे प्रगतिपथावर आहेत.
यामध्ये नालेसफाई आणि रुंदीकरण, खोलीकरण आणि विस्तारीकरणाची कामे, भूमिगत टाक्या सुरू आहेत. मुंबईत या वर्षी 127 ठिकाणी पाणी तुंबणारी ठिकाणे निश्चित झाली होती. यातील 29 ठिकाणी पालिकेने आवश्यक उपाययोजना केल्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबणार नाही.

महापालिका म्हणते…
मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी 50 मिमी पाऊस झाला तरी पाणी वाहून नेण्याची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वातावरणात झालेल्या बदलांमुळे दोन ते तीन दिवसांत एक महिन्याचा म्हणजेच सुमारे एक हजार मिमी पाऊस पडल्याचे प्रकार घडत आहेत. अशा ढगफुटीसदृश पावसामुळे पाणी तुंबण्यासोबतच जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे, पूर येणे अशा समस्या निर्माण होत आहेत.

अशी आहेत पाणी तुंबणारी ठिकाणे
के वॉर्ड अंधेरी पूर्व-पश्चिम – 23
एफ/उत्तर माटुंगा, शिवडी, वडाळा – 8
ई वॉर्ड भायखळा – 8 ठिकाणे
एच वॉर्ड वांद्रे-सांताक्रुझ – 15
एल वॉर्ड कुर्ला – 6 ठिकाणे

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं