लोकसभा निवडणुकीत मातब्बर असणाऱ्या उमेदवारांची(nomination) चर्चा जास्त रंगत असते. मात्र त्यांच्यासोबत इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. मग प्रसिद्धीसाठी असो वा आवड म्हणून उमेदवारी अर्ज भरणारे हौशी असतात. असाच एक अवलिया गेल्या तीन टर्मपासून उमेदवारीचा अर्ज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भरत आला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत(nomination) त्याने 11 हजार, तर 2019 च्या निवडणुकीत साडेसहा हजार मतदान मिळवले आहे. त्यामुळे चर्चेत राहिलेल्या या अवलियाने यंदाही सायकल वरून येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 14 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करत असून यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी 2024 आणि 19 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10 हजार 963 आणि साडे सहा हजारांचं मतदान मिळवलं होतं, यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सलून व्यावसायिक असलेले 43 वर्षीय संदीप संकपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात सायकल वरून प्रवास करत आले.
लांबसडक मानेपर्यंत केस,रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे सचिन संकपाळ यांना त्यांच्या गावी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे भावी खासदार म्हणून ओळखलं जातं. आई पत्नी आणि दोन मुलांसह ते राहतात, 2019 मध्ये स्थापन केलेल्या ‘बरंच काही’ फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात दीपावली आणि सणांदिवशी गोरगरीब लोकांना मदतीचा हात, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संदीप संकपाळ यांचं सामाजिक काम सुरू आहे.
हेही वाचा :
काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव भाजपमध्ये प्रवेश करणार
सांगलीत फडणवीस – संंभाजी भिडे यांच्यात ‘गुफ्तगू’; संजयकाकांसाठी फिल्डिंग की…?
चर्चा तर हाेणारच! शरद पवार गटाचा नेता अजित पवार गटाच्या आमदारांच्या भेटीला