मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील(political advertising) षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना खासदार(political advertising) संजय राऊत यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे, मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे. पण, पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल आभार मानतो, अशी सर्वधर्मीयांचे आभार मानत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात, आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण, आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार, ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं, त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, यापुढे भाजपसोबत जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम दिला तर देशाचा काम कोण करणार, असा सवाल उपस्थित करत भाजपने नेमणूक केलेल्या प्रभारी व सहप्रभारी यांच्या नियुक्तीवर ठाकरेंनी आक्षेप घेतला. तसेच, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतायत? जाऊद्या ना घरी, आता वाजवले की बारा… आता एवढे बारा वाजवले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. दरम्यान, राज्यातील 11 विधानपरिषद जागाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. जर, अपात्र आमदारांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे, तर मग तुम्ही ही निवडणूक घेणार कशी, असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.
भुजबळ शिवसेनेत जाणार? अशी चर्चा आता सुरू आहे. पण, भुजबळ तुमच्याशी बोलले? ते माझ्याशी बोलले? सगळे समजदार आहेत ते त्यांचा बघतील ना? तुम्हाल त्याचा काय?, असे म्हणत भुजबळांच्या शिवसेना पक्षातील चर्चेला ठाकरेंनी पूर्णविराम दिला. मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कदाचित खासदार खासदार व्हाल. म्हणून पराभव झालेल्या उमेदवारांचा सत्कार मी केला. हे सरकार आता चालेलअसं वाटत नाही. ते म्हणताय मराठी हिंदू मत मिळाली नाहीत. शिवसेनेला मुस्लीम मतं मिळाली, हो आहे जरूर पडले आहेत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली आहेत. डोम कावळे तिकडे बसलेत आता त्यांचा पिंडदान सुद्धा आलाय
नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा(political advertising) पाहा आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत?, असा सवाल ठाकरेंनी विचारला. तसेच, आम्ही पाठीमागून वार करणारे नाही, समोरून वार करणारे आम्ही आहोत. अनेक युट्युबर आहेत त्यांनी आम्हाला साथ दिली. मिंदे बोलतायत शहरी नक्षलवाद. म्हणजे मी देश वाचवत असेल तर मी आतंकवादी होतो
अमोल तुला पाडलेला गद्दार काय म्हणतो, मी जर तिकडे गेलो नसतो तर मला आतमध्ये टाकलं असतं. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता, धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा, असे चॅलेंजच ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा
उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्त पाठिंबा काही जणांनी दिला, उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट पाठींबा दिला. म्हणजे बिन शर्ट पाठिंबा दिला, बघा मी उघड पाठिंबा देतो म्हणाले फक्त उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवरही हल्लाबोल केला.
हेही वाचा :
रिंकू पाटील ते आरती यादव एक रक्तरंजित प्रवास…….!
“जरांगेंचे समाधान होतच नाही…” सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन
कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का? माजी आमदार अजितदादांची साथ सोडणार