ताजमहल बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ

देशातील सर्वात प्रतिष्ठित पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहालला बॉम्बने(bomb) उडवण्याची धमकी मिळाली आहे. अराजकतावादी घटकांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत मेलवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर ताजमहालची सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली.

“पर्यटन विभागाला ईमेल प्राप्त झाला. त्याआधारे ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ताजमहल सुरक्षा एसीपी सय्‍यद अरीब अहमद यांनी सांगितले. ताजमहालच्या सुरक्षेसाठी एकीकडे आग्रा पोलिसांनी बाहेरील भागात तर सीआयएसएफने ताजमहालच्या आत सखोल तपासणी सुरू केली आहे. यासाठी श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

माहितीनुसार, पर्यटन विभागाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये ताजमहालच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले आहे. या बॉम्बच्या स्फोटाची वेळ सकाळी नऊ वाजता निश्चित करण्यात आली आहे. हे थांबव(bomb)ता येत असेल तर थांबवा, असे आव्हानही देण्यात आले आहे. हा मेल पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचताच त्यांनी वरिष्ठांना कळवले. यानंतर या प्रकरणाची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस, सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

बॉम्बची माहिती मिळताच या सर्वच विभागात खळबळ उडाली आहे. सर्व विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संयुक्त तपास सुरू केला. या क्रमाने श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकांना पाचारण करून ताजमहालच्या आत आणि बाहेर सखोल तपास केला जात आहे. संशय आल्यावरही अनेक ठिकाणी जमीन खोदून बॉम्ब शोधण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजमहाल कॉम्प्लेक्समध्ये बॉम्ब असल्याबाबत अद्याप कोणताही सुगावा मिळालेला नाही.

शहाजहान आणि मुमताज यांच्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. यामध्ये परदेशी पर्यटकांचीही मोठी संख्या आहे. आग्राच्या कमाईचा मोठा हिस्सा ताजमहाल पर्यटनातून येतो.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती

च्विंगम प्रमाणे जिवंत कोंबडीला चघळू लागली गाय Video Viral…

अजितदादांनी उगाच भाजपला पाठिंबा दिला नाही; ‘या’ तीन मुद्द्यांत दडलंय मोठं पॉलिटिक्स