इचलकरंजी येथे रात्री वसुलीसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांसह तिघांना मारहाण

महिला बचत गटाकडील थकीत एक हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास(financial planner) आलेल्या आणि छत्रपती शासनच्या दिव्याताई मगदूम यांच्याशी उध्दट वर्तन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांची दत्तनगर कबनूर येथील महिलांनी धुलाई केली.

दरम्यान, या प्रकरणी रेश्मा अर्शद मणेर (रा. दत्तनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून(financial planner) कृष्णा रवि शिंदे, उध्दप्पा मारुती मुदगलवार, प्रविण पुंडलिक जाधव (तिघे रा. निपाणी), जावेद अझहर मकानदार व परवीन अल्लाउद्दीन हैदर (दोघे रा. कबनूर) या पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी कबनूर येथील दत्तनगर परिसरात बचत गटाचा एक हप्ता थकल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून बचत गटातील महिलांच्या दारात जावून वसुलीचा तगादा लावत होते. गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत वसुलीसाठी महिलांच्या दारात थांबत होते.

सदरची माहिती मिळताच दिव्याताई मगदूम या घटनास्थळी आल्या. त्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत असताना तेथे असलेल्या कर्मचारी व दोन महिलांनी मगदूम यांना उध्दटपणे उत्तरे दिली. या प्रकाराने संतप्त मगदूम यांच्या समर्थक महिलांनी त्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धुलाई केली.

या घटनेने दत्तनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांना तिघांना पोलिसांनी चौकीसाठी ताब्यात घेतले. तर रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये छत्रपती शासनच्या महिलाध्यक्षा दिव्याताई मगदूम व मायक्रो फायनान्सचे कर्मचारी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये आले होते.

हेही वाचा :

कोल्हापूर : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या प्रचाराचा वाढणार वेग !

सुहाना खान व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘मी ब्रेकअप केलंय’

रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश