“सांगलीतील थरार: धारदार शस्त्राने हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर”

तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून गुरुवारी (settlement)सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाला. बस स्थानक चौक आणि दलित वस्तीत हा प्रकार घडला. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय २४ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने वायफळे येथे दहशतीचे वातावरण आहे. आता या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे.

सीसीटीव्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय.उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा मृत्यू झाला. संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार, आदित्य गजानन साठे, (settlement) आशिष गजानन साठे ही हल्ल्यातील जखमींची नावे आहेत. या हल्ल्यातील मुख्य आरोपी हा बरेच वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वायफळे येथील फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. भांडणाचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं. दोन्ही कुटुंबातून एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता. हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांची टोळकी दुचाकीवरून (settlement)वायफळे येथील बसस्थानक चौकात आले. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य आणि आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

हेही वाचा :

IPL झालं आता WPL 2025 लिलावाचा थरार रंगणार..

गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video

भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा