हत्येचा थरार, माजी उपसरपंचाचा दिवसाढवळ्या खून

पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूरमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञाताने (deputy)माजी उपसरपंचावर रविवारी दुपारी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे उपसरपंचाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे(deputy) माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर आज दुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तरुणाने धारदार शास्त्राने दत्तात्रय यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची त्यांच्या घराजवळच अज्ञात तरुणाने हत्या केली. दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.

हेही वाचा :

‘चूक झाली असल्यास..’; राज ठाकरेंना मोठा धक्का!

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं…

“हिरवं तोडं, टक्कल अन् भयानक लुक! ओळखा ७०च्या दशकातील ही अभिनेत्री!”