मुंबई – बॉलिवूड अभिनेता(actor) सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असतानाच, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला ज्यामुळे सर्वांची झोप उडाली. फोन करणाऱ्याने सांगितलं की, टायगर श्रॉफच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात पंजाबमधील एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पण, चौकशीनंतर हे प्रकरण बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याच्याबद्दल हा दावा करणारी व्यक्ती खोटं बोलत होती.

मंगळवारी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, पंजाबमधील रहिवाशी ३५ वर्षीय मनीष कुमार सुजिंदर सिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता(actor) टायगर श्रॉफला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याबद्दल मुंबई नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
खार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, त्या व्यक्तीची ओळख मनीष कुमार म्हणून झाली आहे. त्याने खोटा दावा केला की, काही लोकांना ३५ वर्षीय अभिनेत्याला मारण्यासाठी शस्त्र आणि २ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या व्यक्तीने सोमवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्याने फोनवर सांगितलं की, एका सिक्योरिटी एजन्सीचे काही लोक टायगर श्रॉफला मारणार आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या आठवड्यात, गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुलाने अशीच धमकी दिली होती. सलमान खानला वाय-प्लस सुरक्षा आहे. एक दिवसापूर्वीच बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशान सिद्दीकीलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
दरम्यान, टायगर श्रॉफच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर , त्याने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर तो बागी, ए फ्लाइंग जट, मुन्ना मायकल, वेलकम टू न्यूयॉर्क, बागी 2, स्टुडंट ऑफ द इयर 2, वॉर, बागी 3, हिरोपंती 2, गणपत यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. २०२४ मध्ये, तो बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये दिसला.
हेही वाचा :
प्रसिद्ध अभिनेत्रीनं गर्लफ्रेंडसोबतच गुपचूप बांधली लग्नगाठ
LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू, जाणून घ्या बुकिंगसाठीचा नवा नियम
‘मी याबाबत त्यांच्याशी बोललो….’ उद्धव – राज ठाकरे एकत्र येण्यावर शरद पवार काय म्हणाले?