अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वारंवार महाविकास आघाडीचे उमेदवार(political) शाहू महाराज छत्रपती यांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याबद्दल आदर असून त्यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरु नये, अशी भूमिका वारंवार पालकमंत्री मुश्रीफ यांनी मांडली आहे.

गुरुवारी पुन्हा एकदा मुश्रीफांनी शाहू महाराज(political) यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीला डिवचले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी शाहू महाराज यांना फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.

शाहू छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले. त्यामुळे ते वादात ओढले जाणार हे उघड होते. म्हणूनच त्यांना मी पूर्वीपासून राजकारणात येऊ नये अशी विनंती केली होती. अजूनही वेळ गेलेला नाही त्यांनी उमेदवारीबाबत फेरविचार करावा, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.

ज्यावेळी खासदार संजय मंडलिक यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ही उलट उत्तर दिले जातील. तेव्हा वादाला सुरुवात होईल असं मला वारंवार वाटत होतं. जर काँग्रेसला खरोखरच छत्रपती यांच्या बद्दल आदर होता तर त्यांनी राज्यसभा द्यायला हवी होती. महायुतीने देखील संभाजी राजेंना खासदार केलेच होते. त्यामुळे या वादावर पडदा टाकावा, अशी आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

हेही वाचा :

भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत ‘या’ नेत्याची थोरल्या पवारांना साथ

पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं… उचललं हे मोठं पाऊल

कोल्हापुरात ‘राजकीय’ शर्यत! संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज