दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

दिवाळी संपून आता काहीच दिवस झाले आहेत. दिवाळीच्या(Diwali) निमित्ताने अनेकजण घरात फराळ बनवतात. या फराळामध्ये गोड, तिखट, चमचमीत, खमंग अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. अनेकजण फराळ संपावा म्हणून घरच्यांच्या धाकाने नाक मुरडून तो नाश्त्यात, जेवणात सुद्धा त्याचे सेवन करतात. तेव्हा तुम्हाला अशा रेसिपी विषयी सांगणार आहोत ज्या तुम्ही दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करू शकता.


उरलेल्या फराळापासून बनवा खमंग थालीपीठ :
फराळातील चकल्या, चिवडा आणि तिखट शेव उरली असेल तर ती एकत्र करून घ्या. सर्व पदार्थ कुस्करून त्याचे बारीक तुकडे करा आणि मग हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर तयार करा. मिक्सरमधील तयार झालेल्या पावडरमध्ये थोडे गव्हाचे पीठ घाला आणि मग तुमच्या आवडीनुसार त्यात कांडा, टोमॅटो, मिरची, कोबी, मेथी, आलं लसूण पेस्ट इत्यादी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रणात दही किंवा ताक घालून कणिक भिजवा आणि मग या पीठाने खमंग थालीपिठ तयार करा. यामुळे दिवाळीचा फराळ वाया जाणार नाही आणि नवीन पदार्थ कुटुंबातील व्यक्ती आवडीने खातील.

लाडू, करंजी, शंकरपाळ्यांपासून बनवा ‘गोड पोळ्या’ :
दिवाळीत (Diwali)फराळातील लाडू, करंजी आणि शंकरपाळ्या इत्यादी गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी तुम्ही उरलेल्या शंकरपाळ्या, लाडू, कारंजी इत्यादी एकत्र करून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्या. तूप वापरून त्या पिठाचा लाडू सारखा गोळा तयार करा. मग कणिक मळून पुरणपोळीचा जसे सारण भरतो तसे लाडवाचा गोळा त्यात भरा आणि पोळ्या लाटून घ्या. मग तव्यावर या पोळ्या खरपूस भाजून घ्या, अशा प्रकारे गोड पोळ्या तयार होतील. नाश्त्याला या गोड पोळ्यांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

हेही वाचा :

उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली;

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, 24 कॅरेटचे भाव

एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी