आज 18 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी(rashi) आहे. प्रतिपदा तिथी दुपारी 1 वाजून 16 मिनिटांपर्यंत राहील. वज्र योग रात्री 9 वाजून 34 मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच अश्विनी नक्षत्र शुक्रवारी दुपारी 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत जागृत असेल.
आज राहू काळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने 3 राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची दाट संभावना आहे. आता या राशी(rashi) नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.
मेष रास : आज तुमची सगळी कामे उरकतील. तुम्हाला आज संपूर्ण दिवस प्रसन्न वाटेल.दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. तसेच, आज प्रेमासाठी खास दिवस असेल. तुमचा विवाहाचा योग जुळून येईल. व्यापारी वर्ग खुश राहील.
वृषभ रास : आज सकारात्मक विचार ठेवाल. यामुळे तुम्हाला आज प्रगतीच्या नवीन दिशा मिळतील. राजकीय व्यक्तींना आज मोठा फायदा होईल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचे कौतुक होईल. प्रशंसेस पात्र व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन रास : आज तुम्ही नवीन घर खरेदी कराल.विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल.कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल.
हेही वाचा:
भाजप-अजित पवार गटाला भगदाड; तीन बडे नेते ठाकरेंच्या गळाला
दप्तराचे ओझे शरीराच्या वजनाच्या १५% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आरोग्यपूरक सल्ला
गिटार वाजवत गाणं गात भाजी विकणाऱ्या तरुणाची धूम; स्विगी इंस्टामार्टनेही केलं कौतुक