आज 30 ऑगस्टरोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील(lakshmi) द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी शुक्रवारी रात्री 2 वाजून 27 मिनिटपर्यंत असणार आहे. आजच्या दिवशी व्यतिपात योग जुळून येणार आहे. हा योग आज सायंकाळी 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील. याचा फायदा काही राशीच्या व्यक्तींना होणार आहे.
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण(lakshmi) केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 30 ऑगस्टचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे.
मेष रास : आज तुमची सगळी कामे उरकतील. तुम्हाला आज संपूर्ण दिवस प्रसन्न वाटेल.दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल.
वृषभ रास : आज सकारात्मक विचार ठेवाल. यामुळे तुम्हाला आज प्रगतीच्या नवीन दिशा मिळतील. राजकीय व्यक्तींना आज मोठा फायदा होईल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचे कौतुक होईल. प्रशंसेस पात्र व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.
मिथुन रास : आज तुम्ही नवीन घर खरेदी कराल.विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल.कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.
कर्क रास : तुमच्यातील कालगुणांना वाव मिळेल. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहील. तुमच्यावर आज धनवर्षाव होईल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल.
सिंह रास : आज गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुमचे अडकलेले पैसे आज परत मिळतील. तुमची रखडलेली कामे देखील आज मार्गी लागतील. तुमचे मन आज प्रसन्न राहील.
कन्या रास : आज प्रेमासाठी खास दिवस असेल. तुमचा विवाहाचा योग जुळून येईल. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
तूळ रास : आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. नियोजित कामात बदल करू नका.
मीन रास : घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. आज लांबच्या ठिकाणी प्रवास योग आहे.
हेही वाचा:
काँग्रेसचा ‘तो’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
भारताच्या आणखी एका क्रिकेटरने खेळाला केला अलविदा!
स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं, चौकशीतून पुतळ्याबाबत नवी माहिती समोर…