आज 6 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी(rashi) असणार आहे. तृतीया तिथी आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज रवि योग व रात्री 10 वाजून 15 मिनिटांपर्यंत शुक्ल योग असेल. तसेच आज अभिजित मुहूर्त पहाटे 11वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत असेल.
आज हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच ‘हरतालिकेचे व्रत’ केले जातात. आजच्या दिवशी लग्न झालेल्या महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर, कुमारिका या उत्तम नवरा मिळावा, म्हणून हरतालिकेचे व्रत करतात. आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीवर(rashi) शिव-पार्वतीची कृपा राहील, ते पाहुयात.
आजचे राशीभविष्य
मेष रास : आजच्या या शुभ दिनी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. शिव-पार्वतीच्या कृपेने तुमचे नाते बहरत जाईल. तुमच्यावर आज सुख-समृद्धीचा वर्षाव होईल. तुमचा आजचा दिवस आनंदी जाईल.
वृषभ रास : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तुमचे जूने मित्र भेटतील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. स्वादिष्ट जेवणाचा बेत बनेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कर्तृत्व सिद्ध करण्याचा असेल. स्वतःवर विश्वास ठेवा.
मिथुन रास : स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका. आज तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल. शिव-पार्वतीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. प्रेमाबाबतीत आज तुम्ही मोठा निर्णय घ्याल. तुमचे नाते लग्नाच्या निर्णयापर्यंत जाईल.
कर्क रास : विद्यार्थ्यांनी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या.
धनू रास : आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात. आज तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा लाभ होऊ शकतो.
हेही वाचा:
लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज; 4500 रुपये मिळवण्यासाठी माहिती
महाराष्ट्रात 1.17 लाख कोटींच्या चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता: 29 हजार नोकऱ्यांची संधी
राहुल गांधींचा हल्लाबोल; पंतप्रधान मोदींनी जीएसटी, नोटाबंदी आणि कृषी कायद्यांसाठी देशवासीयांची माफी मागावी